अर्रार्र! सासऱ्याची बोकडे चोरणाऱ्या चोरट्यांकडून जावयास चोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

सासऱ्याची बोकडे चोरणाऱ्या चोरट्यांकडून जावयास चोप

गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरासमोर बांधलेली 35 हजार रुपये किंमतीच दोन बोकडे सोडून नेली. त्यानंतर संशय आल्याने सासरे व त्यांचे जावई जागे झाले. त्या दोघांनी चोरट्यांचा पाठलाग केला आणि काही अंतरावर थांबलेल्या संशयितांना त्यांनी हटकले. त्यावेळी तेथील तिघांनी सासऱ्यासह जावयास काठीसह हाताने बेदम चोप दिला. आरडाओरडा होऊ लागल्यानंतर चोरटे नई जिंदगी रोडवरून दुचाकीवर बसून पसार झाल्याची फिर्याद रामचंद्र ढाले यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. पोलिसांनी आता चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. 

सोलापूर : होटगी रोडवरील भारतमाता नगरात राहणाऱ्या रामचंद्र शेवू ढाले यांच्या घरासमोरुन चोरट्यांनी गुरुवारी (ता. 2) पहाटे अडीचच्या सुमारास दोन बोकडे चोरुन नेली. सासऱ्यासोबत चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या जावयास चोरट्यांनी बेदम चोप दिला. 

गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरासमोर बांधलेली 35 हजार रुपये किंमतीच दोन बोकडे सोडून नेली. त्यानंतर संशय आल्याने सासरे व त्यांचे जावई जागे झाले. त्या दोघांनी चोरट्यांचा पाठलाग केला आणि काही अंतरावर थांबलेल्या संशयितांना त्यांनी हटकले. त्यावेळी तेथील तिघांनी सासऱ्यासह जावयास काठीसह हाताने बेदम चोप दिला. आरडाओरडा होऊ लागल्यानंतर चोरटे नई जिंदगी रोडवरून दुचाकीवर बसून पसार झाल्याची फिर्याद रामचंद्र ढाले यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. पोलिसांनी आता चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. 

'मै इधर का भाई हू' म्हणत आरोपीची पोलिसास मारहाण 
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी मल्लू महादेव बिराजदार हे लोधी गल्ली, मुर्गी नाला परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी रस्त्यावर दिसलेल्या व्यक्‍तींना पोलिसांनी हटकले. त्यावेळी आरोपी मुकेश किसनसिंग बोधिलवाले (रा. लोधी गल्ली, सोलापूर) याने 'मै इधर का भाई हू' म्हणत मल्लू बिराजदार यांना फरशी व दगडाने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मुकेश बोधिलवाले याची आई, मेव्हाणा व अन्य पाच अनोळखी व्यक्‍ती त्याठिकाणी आले. त्यांनीही मल्लू बिराजदार यांच्याशी वादावादी करुन गच्ची पकडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या सर्व आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घेतलेले शेत परत करा म्हणून जीवे मारण्याची धमकी 
सोलापूर : विजयपूर रोडवरील मिराबाई शामू राठोड यांनी हत्तूर येथे आरोपींची दोन एकर जमीन काही वर्षांपूर्वी खरेदी करुन घेतली. मात्र, आता ही जमीन परत करा, अन्यथा दहा लाख रुपये द्या म्हणून आरोपी माझ्या शेतात गेले. त्यांना हटकले असता, त्यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्यादी मिराबाई राठोड यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. त्यानुसार रामचंद्र पोमू जाधव, सोनाबाई रामचंद्र जाधव, रवि रामचंद्र जाधव, सतीश रामचंद्र जाधव, बबलू रामचंद्र जाधव, शिल्पा रवि जाधव यांच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breathless beating by thieves stealing goats