ब्रेकिग - नगरमध्ये आणखी एक कोरोनाचा रूग्ण, संख्या गेली तीनवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

आता सापडलेला रूग्ण त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते. दुसरा रूग्ण हा ग्रामीण भागातील आहे. मात्र, तो परदेशात गेला होता. त्याला तेथेच बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. आता तिसरा रूग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

नगर - कोरोना नगर जिल्ह्याची पाठ सोडायला तयार नाही. आतापर्यंत जिल्ह्यात २५६जणांना क्वॉरंटाईन केलं आहे. परंतु दोन कोरोनाचे रूग्ण आढळून आले होते. परंतु आज आणखी एक रूग्ण असल्याचे समोर आला आहे. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशाससनही खडबडून जागा झाला आहे. केवळ दोनजणांचे रिपोर्ट येणं बाकी असतानाच ही मनहूस खबर आली.

नगर जिल्ह्यात बाहेर आलेल्या लोकांमुळेच संसर्ग झाला आहे. परदेशी गेलेल्या ४०जणांच्या चमूने ही ब्याद आणली आहे. त्यांच्यावर प्रशासनाचा वॉच होता. डॉक्टरांचा त्यांच्यावर संशय होता. आणि रिपोर्टमुळे तो खरा ठरला आहे.

कोरोनाची लागण झालेली व्यक्ती ही व्यक्ती वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होती. दुबईहून आल्यानंतर ती व्यक्ती क्वॉरंटाईन झाली नाही. नंतर जिल्हा प्रशासनाने क्वॉरंटाईन केल्यानंतर त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता.

आता सापडलेला रूग्ण त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते. दुसरा रूग्ण हा ग्रामीण भागातील आहे. मात्र, तो परदेशात गेला होता. त्याला तेथेच बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. आता तिसरा रूग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

तिसरी व्यक्ती परदेशात गेलेली नव्हती, ती कोणाच्या तरी संपर्कात आलेली असावी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brekig - Another corona patient in Ahmednagar