सांगली : पलूसच्या मंडल अधिकाऱ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

आठ हजारांची घेतली लाच; सातबारा नोंदीतील तक्रारीच्या चौकशीसाठी मागणी
सांगली : पलूसच्या मंडल अधिकाऱ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

सांगली : सातबारा उताऱ्यातील नोंदीचा चौकशी अर्ज निकाली काढण्यासाठी पलूस येथील (palis, snagli) मंडल अधिकारीसह दोघांना आठ हजारांची लाच (bribe case arrested) घेताना रंगेहात पकडण्यात आले. मंडल अधिकारी किरण नामदेव भिंगारदेवे (वय ५७, रा.विटा) व खासगी इसम वसंत रामचंद्र गावडे उर्फ बारु (वय ७१) अशी त्या दोघांची नावे आहेत. (crimecase) सांगलीच्या (sangli) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. गेल्या पंधरा दिवसात ही दुसरी कारवाई आहे.

अधिक माहिती अशी, की तक्रादार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली आहे. सदर जमिनीचा सातबारा उताऱ्याच्या नोंदीत तक्रार करण्यात आली होती. हा तक्रारी अर्ज मंडल अधिकारी भिंगारदेवे याच्याकडे करण्यात आला होता. तो अर्ज निकाली काढण्यासाठी भिंगारदेवे याने खासगी इसम वसंत गावडे याच्या मार्फत दहा हजारांच्या लाचेची मागणी केली.

सांगली : पलूसच्या मंडल अधिकाऱ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात
कोरोनामुळे असा झाला बालकांच्या मानसिकतेत बदल ; जाणून घ्या तज्ञांचे मत

दरम्यान, तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबिंधक विभागास (bribery prevention department sangli) तक्रार केली. विभागाकडून तक्रारीची पडताळणी करण्यात आली. मंडल अधिकारी भिंगारदेवे याच्यासाठी दहा हजारांची मागणी केली असून चर्चेअंती आठ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज पलूस येथील दत्तनगर भागात लुचलुचपत प्रतिबिंधक विभागाने सापळा रचला. मंडल अधिकारी याच्यासाठी आठ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आली.

मंडल अधिकाऱ्यासाठीच ही लाच घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. त्यानुसार दोघांविरोधात पलुस पोलिस ठाण्यात लाचलुचपत अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपतचे उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरुदत्त मोरे, अंमलदार बाळासाहेब पवार, सीमा माने, संजय संकपाळ, अविनाश सागर, अजित पाटील, रवींद्र धुमाळ, भास्कर भोरे, संजय कलगुटगी यांचा कारवाईत सहभाग होता.

सांगली : पलूसच्या मंडल अधिकाऱ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात
108 वर्षांच्या आजींची जिद्दच भारी; जयंत पाटीलांकडून साडी चोळीचा सत्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com