कऱ्हाडजवळ नववधूचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

विवाहानंतर काही तासांतच दुर्घटना; दीरही ठार, अन्य सात जखमी
कऱ्हाड - चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार पलटी होऊन कोल्हापूर येथील नववधू व तिच्या दीराचा मृत्यू झाला, तर अन्य सात जण जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड येथे पंकज हॉटेलसमोर काल रात्री पावणेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मोहिनी मनोहर शेंडगे (वय 30) असे या नववधूचे नाव असून, काल दुपारी पुणे येथे विवाह झाल्यानंतर ती सासरी कोल्हापूरला निघाली होती. तिचा दीर सुदीप तुकाराम आवले (32, रा. तेरावी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले, की पुणे येथील मोहिनी यांचा विवाह कोल्हापूर येथील सागर तुकाराम आवले (वय 31) यांच्याशी काल दुपारी दीड वाजता पुण्यात झाला. काल सायंकाळी वऱ्हाड कोल्हापूरला निघाले होते. वधू-वर व्हॅगनआर मोटारीमध्ये (एमएच 09 एडी 038) होते. रात्री पावणेदहाच्या सुमारास येथील पंकज हॉटेलसमोर येताच चालकाचा मोटारीवरील ताबा सुटला. मोटार पलटी होऊन रस्त्याच्या विरूद्ध बाजूला गेली. दुसऱ्या मोटारीला (एमएच 50 ए 6653) त्यांची जोरदार धडक बसली. मोटारीखाली सापडल्याने वधू मोहिनी व त्यांचा दीर सुदीप जागीच ठार झाले. अपघातात अन्य सहा जण जखमी झाले. त्यांची नावे अशी - सागर तुकाराम आवले (वय 31), सुरेश सागर कालेकर (11), विजयसिंह मानसिंग थोरात (35), अशोक भीमराव सूर्यवंशी (45), सौ. आश्‍विनी सागर कालेकर (30) व प्रशांत (पूर्ण नाव समजू शकले नाही, वय 28). जखमींवर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: bride death in accident