सोलापुरातील उड्डाणपूल रस्त्यांच्या रुंदीत वाढ

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation

सोलापूर : शहरातील प्रस्तावित दोन उड्डाणपुलांच्या रस्ता रुंदीकरणात वाढ करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. रुंदीसंदर्भात महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मंजुरीमुळे  या मार्गावरील तीन आरक्षणे पूर्णपणे रद्द होणार आहेत.

शहरात दोन विभागात उड्डाणपूल होणार आहेत. विभाग एकमध्ये जुना पुणे नाका ते शिवाजी चौक ते मेकॅनिकी चौक ते भय्या चौक ते सात रस्ता ते कारागिर पेट्रोलपंप ते पत्रकार भवन (मोरारकाबंगला) ते विजापूर रस्ता या विभागातील विद्यमान रस्ता रुंदीच्या आखणीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रस्तावित केलेल्या योजनेनुसार रस्त्याच्या क्षेत्रात वाढ करून ही योजना राबविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. 

विभाग दोनमध्ये शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती चौक ते जुना बोरामणी नाका ते शांती चौक ते पोलिस हेड क्वॅार्टर चौक ते अशोक चौक ते तुकाराम चौक ते गुरूनानक चौक ते महावीर चौक ते मोरारका बंगला या विभागातील रस्ताही रूंद करण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठवले होते. त्यासाठी 16 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या महापालिकेच्या ठरावाचा आधार घेण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेने 11 मे 2018 रोजी बदलास मान्यता देण्याचे पत्र शासनाकडे पाठवले होते.

त्यासंदर्भात नगर रचना विभागाने तपासणी केली असता, पत्रानुसार बदल करता येणे शक्य असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार दोन्ही उड्डाणपुलांच्या रस्त्याची रुंदी वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

असा होईल फेरबदल
- विभाग एकमधील बाधीत होणारी आरक्षणे वाढीव रस्ता रुंदीकरणानंतरही वापरण्यायोग्य व बांधकामयोग्य क्षेत्राची रहात असल्याने बाधीतक्षेत्र वगळून उर्वरीत
क्षेत्रावरील आरक्षणे कायम राहणार आहेत.
- विभाग दोनमधील तीन आरक्षणे संपूर्णतः बाधीत होत असल्याने ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामध्ये आरक्षण क्रमांक 5-9 (व्यापारी संकुल), 5-10 व 5-11 (वाहनतळ) ही रद्द करण्यात आली आहेत. या आरक्षणासाठी निश्चित केलेले क्षेत्र रस्तारुंदीकरणात समाविष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com