डिसेंबरअखेर 642 गावांत ब्रॉडबॅंड सेवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - भारतीय दूरसंचार विभागातर्फे डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 29 गावांत हायटेक ब्रॉडबॅंड सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 642 गावे या सेवेला जोडण्यात येतील. 800 किमी अंतराच्या केबल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरअखेर ही सेवा कार्यान्वित व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकार, राज्य शासन व भारतीय ब्रॉडबॅंड नेटवर्क यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार नेटवर्क जोडणीचे काम सुरू आहे.

सेवेत ई-पंचायत राज, ई-गर्व्हनन्स संग्राम योजना अशा सुविधा कार्यान्वित होणार आहेत. प्रकल्पामुळे ग्रामीण नागरिकांना प्रशासकीय तांत्रिक सेवासुविधा गतीने मिळण्यास मदत होईल. त्यातून ग्रामस्थांची वेळेची व पैशाची बचत होणार आहे. तसेच ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक होण्यास मदत होईल.
देशातील सर्व ग्रामपंचायती नेटवर्कद्वारे जोडण्यात येत आहेत. त्यात महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पंचायत राज संस्थांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने मुख्यमंत्र्यांनी या कामांची गतिमानता वाढवावी, अशा सूचाना दिल्या होत्या. त्यास अनुसरून कोल्हापूर जिल्ह्यातील कामालाही गती देण्यात आली आहे. या प्रकल्पात एकूण 1 हजार 635 किमीची केबल जोडण्यात येणार आहे. त्यांपैकी पहिल्या टप्प्यात 800 किमीची केबल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यात 8 तालुक्‍यांतील गावांना केबल देण्याचे काम सुरू आहे.

सहकार्य करण्याचे आवाहन
कामांसाठी निशुल्क मार्ग हक्क देण्याच्या सूचना विविध विभागांना आहेत. त्यानुसार ग्रामविकास विभाग, जलसंपदा, स्थानिक स्वराज्य संस्था, वीज वितरण कंपनी, पोलिस यांचे सहकार्य लाभत आहे. केबल जोडणीसाठी कोणत्याही प्रशासकीय विभागाच्या यंत्रणेची पूर्वमान्यतेची आवश्‍यकता नाही. तसेच हा प्रकल्प राष्ट्रीय संपत्तीला पुरक व पंचायत राज संस्थेच्या हिताचा असल्याने ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामंजस्याने सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन भारतीय दूरसंचार विभागाने केले आहे.

Web Title: Broadband service 642 villages in December