बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने भावाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

तासगाव (सांगली)- आपल्या भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे मनाला वाईट वाटून घेऊन धाकट्या भावाने आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी (ता. 20) दुपारी घडला. याप्रकरणी तासगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, की काशीपुरा तासगाव येथे राहणारे चेतन दत्तात्रय पवार (वय 26) यांनी गुरुवारी आपले राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

चेतन पवार यांचा भाऊ मयूर दत्तात्रय पवार याच्यावर डान्स क्‍लासच्या बहाण्याने एका तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी काल रात्री गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली होती. या प्रकाराचे वाईट वाटून घेऊन चेतन पवार यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास तासगाव पोलिस करीत आहेत.

Web Title: Brother committed suicide after register rape case