भावाने बहिणीस सभापती बनवून दिली ओवाळणी

राजशेखर चौधरी
रविवार, 26 ऑगस्ट 2018

अक्कलकोटच्या सभापती सुरेखा काटगाव यांचे लग्न १९९७ साली झाले.पण पुढे ६ नोव्हेंबर २००१ साली त्यांच्या आई श्रीदेवी मल्लिकार्जुन काटगाव यांचे दुर्दैवाने निधन झाले. त्यानंतर त्या सासरी न जाता आपले वडील मल्लिकार्जुन आणि दोन्ही लहान भाऊ सुरेश आणि सुहास यांचा आधार बनून माहेरीच राहण्याचा निर्धार केला.वास्तविक मित्रपरिवारातील अनेक जण त्यांच्या वडिलांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला त्यावेळी दिला होता पण आपल्या मुलीच्या निर्धाराला बळ देण्याचे ठरवून दुसरे लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

अक्कलकोट : हंद्राळ (ता.अक्कलकोट) येथील सुरेखा काटगाव यांनी आपल्या भावावर लहानपणापासून योग्य संस्कार करीत शिक्षण देऊन मोठे करून उद्योगपती बनविले तर भाऊ सुरेश यांनी त्याचे चीज करीत आपल्या बहिणीस अक्कलकोटचे सभापती बनविण्यात पुढाकार घेतला. ही बहीण भावाचे, लहानपणापासून संघर्षातून वर येत आतापर्यंत निरंतर सुरू असलेले जीव्हाळ्याचे नाते ही भावाने बहिणीला दिलेली एक ओवाळणीच आहे.

अक्कलकोटच्या सभापती सुरेखा काटगाव यांचे लग्न १९९७ साली झाले.पण पुढे ६ नोव्हेंबर २००१ साली त्यांच्या आई श्रीदेवी मल्लिकार्जुन काटगाव यांचे दुर्दैवाने निधन झाले. त्यानंतर त्या सासरी न जाता आपले वडील मल्लिकार्जुन आणि दोन्ही लहान भाऊ सुरेश आणि सुहास यांचा आधार बनून माहेरीच राहण्याचा निर्धार केला.वास्तविक मित्रपरिवारातील अनेक जण त्यांच्या वडिलांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला त्यावेळी दिला होता पण आपल्या मुलीच्या निर्धाराला बळ देण्याचे ठरवून दुसरे लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तो निर्णय सुरेखा काटगाव यांनी सार्थ ठरविला ज्यात मोठा भाऊ सुरेश याचे शिक्षण पूर्ण करून त्याला उद्योगपती बनविले तर लहान भाऊ सुहास याला शिक्षक म्हणून काम करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या माहेरी राहण्याच्या निर्णयास त्यांचे पतीनेही होकार ते ही त्यांच्या बरोबरच राहत आहेत.

दोन्ही भावाबरोबरच स्वतःच्या दोन्ही मुलांनाही उच्च शिक्षित बनविले आहे.हे सर्व करीत असतानाच ते संपूर्ण घराकडे लक्ष देऊन राहिले त्यामुळे वडील मल्लिकार्जुन व भाऊ सुरेश यांनी हळूहळू व्यवसाय वाढविला आणि बघता बघता त्यात मोठी मजल आतापर्यंत मारलेली दिसत आहे.बहीणीने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची जाणीव दोन्ही भावानी धरली. सन २०१७ साली झालेल्या पंचायत समिति निवडणुकीवेळी आपला जेऊर पंचायत समिती गण आणि अक्कलकोटचे पंचायत समितीचे सभापतिपदी दोन्ही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले.नेमकी हीच संधी हेरून आमदार  सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे आपल्या बहिणीसाठी सुरेश यांनी साकडे घातले आणि तिकीट मिळविले.

आपल्या बहिणीला कोणताही त्रास होऊ न देता स्वतः प्रत्येक गाव  पिंजून काढत, बहिणीच्या सहकार्याने कमाविलेला पैसा तिच्यासाठीच खर्च करून तिला सभापतिपदी विराजमान करण्यात महत्वाची भूमिका बजावली.यात आमदार म्हेत्रे यांनी तितकीच साथ या बहीण भावाला दिली, त्यामुळेच या सर्व गोष्टी जुळून आल्या. आज रक्षाबंधनाचा सण आहे, गेली अनेक वर्षे संघर्ष आणि कष्ट करून चांगले दिवस आणलेल्या या बहीणीने भावासाठी केलेला त्याग आणि भावाने बहिणीला दिलेली अमूल्य ओवाळणी ही कहाणी मात्र सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे यात संदेह नाही. हे बहीण भावाचे अतूट संबंध निरंतर चालूच राहणार हे मात्र निश्चित आहे.

Web Title: brother help sister in Akkalkot