भांबोऱ्यात शेतीच्या वादातून भावाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

राशीन - वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून मेव्हण्याच्या सांगण्यावरून कट रचून एकाने आपल्या दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाच्या डोक्‍यात टिकाव घातला. यात हनुमंत कोंडिबा चव्हाण (वय ५५) यांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या हनुमंत चव्हाण यांचा मुलगा राहुल चव्हाण याच्या फिर्यादीवरून रमेश कोंडिबा चव्हाण, किरण चव्हाण, गणेश चव्हाण व सुनील रामदास पवार यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत हनुमंत व त्यांचा भाऊ रमेश यांच्यात रविवारी सायंकाळी जमिनीच्या हिश्‍शावरून वाद झाला.

Web Title: Brother murder in rashin land dispute issue

टॅग्स