इचलकरंजी येथे धाकट्या भावाचा डोक्यात दगड घालून खून

इचलकरंजी येथे धाकट्या भावाचा डोक्यात दगड घालून खून

इचलकरंजी - धाकट्या भावाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज पहाटे येथील लंगोटे मळ्यात घडली. दारू पिऊन मारत असल्याच्या कारणावरून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. नितीन सुभाष मगदूम (वय 32, रा लंगोटे मळा, चिंदके शाळेजवळ, इचलकरंजी) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली असून, पोलिसांनी मारेकरी भाऊ सचिन सुभाष मगदूम (36, रेणुकानगर यड्राव, ता शिरोळ) याला ताब्यात घेतले आहे. गजबजलेल्या भागात रस्त्यावर हा प्रकार घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी, नितीन हा दारू पिऊन स्वतःच्या पत्नीला मारत होता. याबाबत वारंवार वाद होत होता. काल (18) रात्री पुन्हा नितीन व त्याची पत्नी सुमन यांच्यात जोरदार वाद झाला, त्यावेळी नितीनने घरातील भांडीकुंडी विस्कटून सुमन यांना मारहाण केली. त्यावेळी भाऊ सचिन हा तेथे आला त्याने नितीनला जाब विचारला. त्यामुळे दोघांच्यात जोरदार भांडण झाले. त्यानंतर सचिनने नितीन याला घरातून बाहेर नेले आणि लंगोटे मळा येथे अग्रवाल याच्या घरासमोर गेल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून ठार मारले.

ही घटना मध्यरात्री दिड वाजता घडली. घटनेनंतर सचिन तेथून निघून गेला. पहाटे फिरायला बाहेर पडलेल्या लोकांनी मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक माहितीवरून तात्काळ हालचाली गतिमान करून मारेकरी सचिन याला ताब्यात घेतले.याबाबत सुमन नितीन मगदूम यांनी फिर्याद दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com