‘भारत स्टेज-३’ वाहनधारकांचा जीव टांगणीला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

नोंदणीसाठी आरटीओत रांगा - सर्व्हर डाऊनचा व्यत्यय; आज अखेरचा दिवस 
कोल्हापूर - भारत स्टेज-३ (बीएस-३) वाहनांच्या नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात लांबलचक रांगा लागल्या आहेत. उद्या (ता. ३१) नोंदणीचा अखेरचा दिवस असून, सर्व्हर डाऊनच्या व्यत्ययाने वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. 

नोंदणीसाठी आरटीओत रांगा - सर्व्हर डाऊनचा व्यत्यय; आज अखेरचा दिवस 
कोल्हापूर - भारत स्टेज-३ (बीएस-३) वाहनांच्या नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात लांबलचक रांगा लागल्या आहेत. उद्या (ता. ३१) नोंदणीचा अखेरचा दिवस असून, सर्व्हर डाऊनच्या व्यत्ययाने वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. 

‘भारत स्टेज-३’ (बीएस-३) वाहनांच्या विक्री व नोंदणीवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या निर्णयामुळे १ एप्रिलपासून ‘बीएस-३’ वाहनांची विक्री करता येणार नाही. वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या संघटनेने न्यायालयाकडे ‘बीएस-३’ तयार असलेली वाहने विक्री करण्याची परवानगी मागितली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. अशा वाहनांची नोंदणी ३१ मार्चपूर्वी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आज ‘भारत स्टेज-३’ वाहन खरेदी केलेल्यांची नोंदणीसाठी धांदल उडाली.

सकाळपासूनच प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहन नोंदणीसाठी लांबलचक रांगा लागल्या. काही वितरकांकडून ‘बीएस-३’ वाहने कमी किमतीत विक्रीस काढण्यात आली. त्यामुळे वाहने खरेदी करण्याकडेही कल वाढला आहे. अशा वाहनांची यात भर पडली. साडेअकराच्या सुमारास कार्यालयातील सर्व्हर डाऊन झाल्याने कामकाज ठप्प झाले, तसे वाहन नोंदणीसाठी आलेले वाहनधारक हवालदिल झाले. वाहनधारक 
एजंट, लिपिकासह अधिकाऱ्यांपर्यंत वाहन नोंदणी होणार का, याबाबत चौकशी करत होते. दुपारी एकच्या सुमारास सर्व्हर सुरू झाल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला; मात्र त्यानंतर त्याची पुन्हा गती मंदावली. सुमारे पावणेदोन लाख रुपये गुंतवणूक करून घेतलेल्या रिक्षाचे जर पासिंग नाही झाले तर करायचे काय, असा दिव्य प्रश्‍न रिक्षाचालकांसमोर उभा ठाकला आहे. 

१ एप्रिलपासून ‘भारत स्टेज-४’ वाहनांचीच नोंदणी केली जाणार आहे. ३१ मार्च २०१७ पूर्वी विक्री करण्यात आलेल्या ‘भारत स्टेज-३’ वाहनांची नोंदणी ३१ पर्यंतच केली जाणार आहे, याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी. 
- डॉ. डी. टी. पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: bs-3 vehicle owner life danger