आता 142 ठिकाणी ‘टू’ जी, ‘थ्री’जी सेवा

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 17 मे 2018

सातारा - गॅसच्या नोंदणीपासून वीज, टेलिफोन बिल, बस, रेल्वेच्या तिकिटांपासून अगदी भोजन मागविण्यासाठी आता लोक सर्रास मोबाईलचा वापर करू लागले आहेत. यामुळेच भारत संचार निगम लिमिटेडने सातारा जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांपासून खेड्यापाड्यांतील १४२ ठिकाणी मोबाईलचे जाळे विणण्याचा निर्धार केला असून, आगामी काळात नागरिकांना ‘टू’ जी व ‘थ्री’जी सेवा मिळणार आहे. 

मोबाईल सुविधा येण्यापूर्वी लॅन्डलाइन सेवा सर्वदूर पोचली होती. मोबाईल आल्यानंतरदेखील लॅण्डलाइन सेवा अस्तित्वात आहे. परंतु, ती मर्यादितच. सध्या लॅन्डलाइन फोन कार्यालयांमध्येच आहेत. घरगुती लॅण्डलाइनची संख्या ही झपाट्याने घटत आहे. मोबाईल येण्याआधी ज्यांच्याकडे लॅण्डलाइन होते, तेच घरगुती फोन सध्या वापरात आहेत. बीएसएनएलची इंटरनेट अर्थात ब्रॉडबॅण्ड सेवा ही लॅन्डलाइनशी संलग्न आहे. त्यांच्याकडेच लॅन्डलाइनआहेत. मात्र, यामध्येदेखील आता राऊटरचा पर्याय आहे. हे राऊटर वायरसह किंवा वायरविना पुरविणाऱ्यांमध्ये खासगी कंपन्या उतरल्या आहेत. त्यातच विविध मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे हॉटस्पॉट डिव्हाईस आहेत. सीम कार्डवरील इंटरनेट हॉटस्पॉटद्वारे जोडण्याची सेवा उपलब्ध आहे. यामुळेच ब्रॉडबॅण्डसाठी लॅण्डलाइन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. 

एफटीटीएच सेवा 
ज्या ग्राहकांना ब्रॉडबॅण्डद्वारे सध्या दोन एमबीपीएसच्या वेगाने इंटरनेट सुविधा मिळत आहे. त्यांना ‘एफटीटीएच’ मुळे दहा एमबीपीएसच्या वेगाने इंटरनेट सुविधा मिळावी यासाठी जिल्ह्यातील केबल ऑपरेटर्सबरोबर कंपनीने करार करण्यास प्रारंभ केला आहे.

Web Title: BSNL 2G 3G Service