खासगी कंपन्यांशी दूरसंचारची टक्कर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

खासगी दूरसंचार कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) 99 व 319 रुपयांत अमर्याद मोफत बोलण्याच्या दोन प्रिपेड योजना बाजारात आणल्या आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये रोमिंग (दिल्ली व मुंबई व्यतिरिक्त) देखील मोफत उपलब्ध असल्याने यास उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्‍वास "बीएसएनएल'कडून व्यक्त केला जात आहे. 

सातारा - खासगी दूरसंचार कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) 99 व 319 रुपयांत अमर्याद मोफत बोलण्याच्या दोन प्रिपेड योजना बाजारात आणल्या आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये रोमिंग (दिल्ली व मुंबई व्यतिरिक्त) देखील मोफत उपलब्ध असल्याने यास उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्‍वास "बीएसएनएल'कडून व्यक्त केला जात आहे. 

प्लॅन 99 मध्ये अमर्याद मोफत कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये कॉलर ट्यून सेवादेखील देण्यात आली आहे. या प्लॅनची वैधता 26 दिवसांची आहे. याबरोबरच प्लॅन 319 अंतर्गंत 90 दिवसांसाठी अमर्याद मोफत कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या दोन्ही योजनांमध्ये अमर्याद मोफत कॉलिंग सुविधा असल्याने ग्राहक आप्तवासियांशी हवे तितका वेळ बोलू शकणार असल्याने योजनेस उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्‍वास "बीएसएनएल'कडून व्यक्त केला जात आहे.

इंटरनेट युजर्ससाठी यापूर्वी "बीएसएनएल'ने 248 रुपयांत 51 दिवसांसाठी 153 जीबी इंटरनेट डाटा देण्याची योजना बाजारात आणणून खासगी कंपन्यांशी टक्कर दिली होती. आता अमर्याद मोफत बोलण्याची सुविधा उपलब्ध केल्याने ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.

Web Title: BSNL Competition With private companies

टॅग्स