बहुजन समाज पक्षाची पहिली यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

सोलापूर - बहुजन समाज पक्षातर्फे महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी मंगळवारी (ता. ३१) जाहीर करण्यात आली. एकूण दोन टप्प्यांत उमेदवारी जाहीर करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यांतील यादी गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे.

सोलापूर - बहुजन समाज पक्षातर्फे महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी मंगळवारी (ता. ३१) जाहीर करण्यात आली. एकूण दोन टप्प्यांत उमेदवारी जाहीर करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यांतील यादी गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे.

मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये १२ जणांची घोषणा करण्यात आली आहे. यात सहा महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. ही यादी घोषित करताना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्यात आला आहे. १२ जणांच्या यादीत बहुजन समाजातील जातींना प्रतिनिधित्व दिले असल्याचे दिसत आहे. यात अनुसूचित जाती, भटके विमुक्त जाती, मुस्लिम, इतर मागासवर्ग व लिंगायत समाजातील उमेदवारांचा समावेश आहे.

पहिल्या यादीमध्ये विद्यमान नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नावाचा समावेश आहे. श्री. चंदनशिवे प्रभाग क्रमांक पाच- ड मधून निवडणूक लढविणार आहेत. ही यादी पक्षाच्या कोनापुरे चाळ येथील संपर्क कार्यालयात जाहीर करण्यात आली. ही घोषणा महाराष्ट्र प्रदेश महासचिव ॲड. संजीव सदाफुले, प्रदेश सचिव सुरेश तुर्भे, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब लोकरे यांच्या त्रिसदस्यीय समितीने केली.

पहिल्या यादीतील उमेदवार
आनंद चंदनशिवे (प्रभाग क्रमांक : पाच ड), स्वाती आवळे (प्रभाग क्रमांक : पाच अ), गणेश पुजारी (प्रभाग क्रमांक : पाच ब), ज्योती बमगोंडे (प्रभाग क्रमांक : पाच क), अमरसेन सावळे (प्रभाग क्रमांक : सहा अ), रशीद शेख (प्रभाग क्रमांक : सहा ड), कीर्ती शिंदे (प्रभाग क्रमांक : सहा क), प्रमिला लोहार (प्रभाग क्रमांक : दोन ब), निर्मला कांबळे (प्रभाग क्रमांक : २० क), भूषण गायकवाड (प्रभाग क्रमांक : २० ड), भानुदास धायगुडे (प्रभाग क्रमांक : २२ ब), ज्योती कसबे (प्रभाग क्रमांक : २३ ब).

Web Title: BSP announced the first list