बुद्धविचारातूनच समताधिष्ठित राष्ट्राची निर्मिती - लक्ष्मण माने 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

कोल्हापूर - गौतम बुद्धांनी दोन हजार वर्षांपूर्वी वर्णव्यवस्थेला छेद देणारे जातिसंस्थेचे ऑपरेशन करून विज्ञाननिष्ठ विचार मांडले आहेत. ते आत्मसात केले तरच समतेच्या तत्त्वावर राष्ट्राची निर्मिती शक्‍य असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ विचारवंत, पद्मश्री लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले. येथील निर्मिती विचारमंच, सम्यक मूव्हमेंटतर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

या वेळी महाराष्ट्र विकास आघाडीच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. सुभाष माने आणि सचिवपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांचा श्री. माने यांच्या हस्ते गौरव झाला. अध्यक्षस्थानी बसवंताप्पा उबाळे होते. 

"धम्म विचार आणि समतेची राष्ट्रनिर्मिती' या विषयावर श्री. माने यांनी विचार मांडले. गौतम बुद्धांच्या काळापासून ते सद्यःस्थितीचा तौलनिक अभ्यास त्यांनी मांडला. ऍड. सुभाष माने यांनी समाजातील जातीयतेची धार कमी होणे हे माणसाच्या उत्कर्षाचे लक्षण असल्याचे सांगितले. कार्यक्रमात "राष्ट्रीय बुद्ध अभियान, चलो बुद्ध की ओर' आवाहन पत्राचे प्रकाशन झाले. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. ज. रा. दाभोळे, डॉ. शरद गायकवाड, ऍड. पंडितराव सडोलीकर, शाहीन शेख, डॉ. अमर कांबळे, सुशीलकुमार कोल्हटकर, नंदकुमार गोंधळी, डॉ. सुनील पाटील, मच्छिंद्र कांबळे, प्रा. विकास विधाते उपस्थित होते. चिंतामणी कांबळे यांनी प्रास्ताविक केले. अनिल म्हमाणे यांनी आभार मानले. सचिन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Buddha thought the creation of the nation