अखर्चित निधीमुळेच बजेट ३४ कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मागील वर्षातील १२.६७ कोटी शिल्लक 

सांगली - सन २०१६-१७ आर्थिक वर्षातील तब्बल १२ कोटी रुपये खर्च न झाल्याने झेडपीचे अंतिम सुधारित बजेट ३४ कोटींवर गेले आहे. गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले अंदाजपत्रक अवलोकनार्थ ठेवणार आहेत. मागील सदस्यांनी शंभर टक्के निधी खर्चाचे नियोजन केले असताना रक्कम शिल्लक राहिली. त्यामुळे नव्या सभागृहाला निधी वाढून मिळणार असल्याचे संकेत आहेत.

जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. निवडणुकीची आचारसंहिता आणि तत्कालीन पदाधिकारी, सदस्यांचा कालावधी संपणार असल्याने झेडपीचे अंदाजपत्रक पुढे ढकलले होते. मात्र सीईओंनी बजेट तयार करून सर्वसाधारण सभेपुढे अवलोकनार्थ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. २०१६-१७ अंतिम सुधारित आणि २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षातील मूळ बजेट प्रशासनाने तयार केले. गतवर्षी ५८ कोटींचे बजेट होते. त्यापैकी १२ कोटी ६७ लाखांचा निधी खर्च झाला नाही. तत्कालीन पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी शंभर टक्के निधी खर्च करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र निधी शिल्लक राहिला. यामुळे चालू आर्थिक वर्षातील बजेटमध्ये वाढ झाली.

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये आरंभीची शिल्लक १२ कोटी ६७ लाख, महसुली जमा १६ कोटी ६५ लाख रुपये याशिवाय भांडवली ४ कोटी ६७ लाख रुपये जमा झालेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील मूळ अंदाजपत्रक ३४ कोटी १ लाख १४ हजार १३० रुपयांचे झाले. तत्कालीन सभागृहाने शंभर टक्के निधी खर्च केला असता तर नव्या सभागृहासाठी अवघे २२ कोटी रुपये शिल्लक राहिले असते. त्यामुळे विकासकामांसह योजनांवर किती खर्च करायचा, असा प्रश्न निर्माण होण्याची साशंकता होती. गत वर्षातील १२ कोटी ६७ लाख रुपये शिल्लक राहिल्याने विद्यमान सभागृहाच्या स्वीय निधीत वाढ झाली.

अंदाजपत्रक अवलोकनार्थ आज ठेवणार
विषय समिती सदस्यांच्या निवडीसाठी उद्या (ता. २०) सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. त्यात २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे मूळ अंदाजपत्रक अवलोकनार्थ ठेवले जाईल.

Web Title: budget 34 crore by without expenditure fund