चंदगड तालुक्यात इसापूर येथे वाघाच्या हल्यात म्हैस ठार

चंदगड तालुक्यात इसापूर येथे वाघाच्या हल्यात म्हैस ठार

चंदगड - इसापूर (ता. चंदगड) येथे वाघाच्या हल्यात म्हैस ठार झाली. बुधवार ते गुरुवार (ता. 9, 10) दरम्यान ही घटना घडली. गावातील सुरेश गवस यांनी बुधवारी सकाळी आपली अकरा जनावरे चरण्यासाठी जंगलात सोडली होती. सायंकाळी त्यापैकी केवळ दहा जनावरे घरी परतली.

म्हैस परत आली नाही म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी जंगलात शोध घेतला असता शेतात एका झुडपात अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत म्हशीचा मृतदेह सापडला. सरपंच स्वप्नाली गवस यांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनरक्षक एच. एस. काळभेर व वनसेवक शंकर गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

श्री. गवस यांच्या म्हणण्यानुसार चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु शासकीय नियमानुसार भरपाई देण्याचा प्रयत्न करु असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान इसापूर, पारगड, तिलारीनगर भागात खूप वर्षापासून वाघाचा वावर असून यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com