पर्यटन व्यवसायात ‘बफर झोन’ला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात आखण्यात आलेल्या टॅकिंग रूट, जंगलातील निवास व्यवस्था, गाइड यांसारख्या पर्यटनास चालना देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पात बफर झोनमधील गावांतील लोकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 

वन्यजीव विभागाकडून त्याचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पाटण, जावळी, महाबळेश्वरसह अन्य तालुक्‍यांतील बफर झोनमधील सुमारे चाळीसपेक्षा जास्त गावांतील स्थानिकांसाठी प्रोत्साहनात्मक व्यवसायाच्या शिफारशी करण्यात येणार आहेत. 

सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी आदी चार जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. त्याच्या बफर झोनमध्ये चाळीसपेक्षा जास्त गावांचा समावेश आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवल्या जात आहेत. काही भागात त्या योजना ताकदीने सुरू आहेत. काही भागात त्याला विरोध होत आहे. स्थानिक लोकांचा त्याला असलेला विरोध व त्यांच्यावर येणारी बंधने या सर्व गोष्टींचा व कोअर झोनमधील विस्थापित होणारे लोक अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनाने बफर झोनमधील गावांना पर्यटन आराखड्याच्या विविध योजनांत समाविष्ट करून घेतले आहे. त्यांना पर्यायी व्यवसायही उपलब्ध करून दिले जात आहेत. बफर झोनमधील स्थानिकांवर पर्यटकांच्याही काही जबाबदाऱ्या सोपवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. कोयना, चांदोली, जावळी व महाबळेश्वर भागातील लोकांना पर्यटन विकास आराखड्यात महत्त्वाचे स्थान देण्यात येणार आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा बऱ्यापैकी भाग जंगलाचा आहे. त्यामुळे याकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. ती गोष्ट लक्षात घेऊन पर्यटन आराखड्यात पक्षी, प्राणी निरीक्षण तसेच त्याचे टॉवर, अभ्यासकांसह पर्यटकांच्या निवासाची, भोजनाची व ट्रॅकिंग रूटची व्यवस्था यासह जंगलातील निवास व गाइड यांसारख्या बाबींचा आराखड्यात समावेश आहे. त्याची सगळी जबाबदारी त्या भागातील बफर झोनमधील स्थानिक ग्रामस्थांवर सोपवण्यात येणार आहे.

...काय आहेत संधी 
जंगलाची माहिती देणारा गाइड
जंगल निवासाची सोय करण्यासाठी व्यवसाय 
पक्षी व प्राणी निरीक्षणांसाठी येणाऱ्यांचे वाटाडे 
ट्रॅकिंग रूटसाठी गाइड 
जंगली पद्धतीच्या जेवणाची व्यवस्था करणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buffer zone priority in tourism business