"ए' इमारतही पाडण्यास सुरवात 

"A 'building also began to collapse
"A 'building also began to collapse

नगर : जिल्हा क्रीडा संकुलातील एमआर ट्रेड सेंटर व एमआर सीटी पॉइंट या विनापरवाना इमारती महापालिकेने पाडल्या. या कारवाईचे नगरकर स्वागत करीत आहेत. असे असले, तरी जिल्हा क्रीडा संकुलातील गाळेधारकांमध्ये फसवले गेल्याची भावना आहे. गाळ्यांवर हातोडा पडल्याने व्यावसायिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. महापालिकेने सुरू केलेली "अतिक्रमण हटाव' मोहीम पाहण्यासाठी नगरकरांनी जिल्हा क्रीडा संकुलासमोर मोठी गर्दी केली होती. 

जिल्हा क्रीडा संकुलात विकासकानेच विनापरवाना अतिरिक्‍त दीड लाख चौरस फुटांचे बांधकाम केले. ते अतिक्रमण पाडण्यासाठी महापालिकेकडून काल (शनिवार) व आज (रविवारी) करण्यात आली. या विनापरवाना बांधकामातील "बी' इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे.

"ए' इमारत पाडण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्हा क्रीडा संकुल परिसरात धुळीचे लोट उठत आहेत. त्यामुळे परिसरातील परवाना असलेले गाळेही बंद ठेवण्याची नामुष्की दुकानदारांवर आली. 

नगररचना विभागातील उपअभियंता तथा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली 40 कर्मचारी, जलसंपदा विभागाची दोन पोकलेन, महापालिकेच्या एका डंपरसह पथक सकाळी साडेसातच्या सुमारास वाडिया पार्कमध्ये गेले. सुरक्षेसाठी कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यांचे पथकही तैनात होते. 

"वाडिया'त एम. आर. सीट पॉइंट ("ए' इमारत), एम. आर. ट्रेड सेंटर ("बी' इमारत) पार्किंगच्या जागेत बांधले आहे. संकुलातील तळघरात सुमारे 48 गाळे विनापरवाना बांधले आहेत. काल व आज "बी' इमारत जमीनदोस्त करण्यात आली. आज दुपारी "ए' इमारत पाडण्यास सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जलसंपदा विभागाची दोन पोकलेन मागविली आहेत. त्यामुळे वेगात कारवाई करणे सोपे जात आहे. मात्र, दुपारी त्यातील एका पोकलेनमध्ये बिघाड झाल्याने एकच पोकलेनने इमारत पाडण्याचे काम सुरू होते. 

गाळेधारकांची भूमिका 
इमारत "ए'मधील गाळ्यांचे "सील' तोडण्यास आज सुरवात होताच गाळेधारकांनी महापालिकेच्या पथकाला विरोध दर्शविला. "महापालिका आयुक्‍तांच्या आदेशानेच 40 गाळेधारकांना "ए' इमारतीत गाळे देण्यात आले आहेत. विकासक व महापालिकेच्या वादात गाळेधारकांवर अन्याय होत आहे. उच्च न्यायालयाने गाळ्यांना "सील' केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच "सील' काढण्यात येईल,' अशी भूमिका गाळेधारकांनी घेतली होती. 

त्या 48 गाळ्यांवरही पडणार हातोडा? 
जिल्हा क्रीडा संकुलातील "ए' व "बी' इमारती पडल्यानंतर तळघरात विनापरवाना बांधलेले 48 गाळे महापालिकेचे पथक जमीनदोस्त करणार आहे. या संदर्भातील सूचना महापालिकेच्या पथकाने संबंधित गाळेधारकांना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com