पहिल्या, दुसऱ्या महायुद्धातील स्मृती जपलेला हा बंगला

सुधाकर काशीद
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

कोल्हापूर - राजारामपुरी सहाव्या गल्लीच्या टोकाला म्हणजे नेजकर यांच्या वाड्याच्या पुढे वस्ती नव्हती. अशा काळात (१९५२) तेथे भाताची शेती होती, हे आता पटणार नाही. कारण एकाहून एक देखणे बंगले आता याच भागात आहेत. अशाच बंगल्यात एक बंगला साधा असूनही त्याला देखणेपणाची वेगळी किनार आहे. कारण दगडी बांधणी व कौलारू छत. या बंगल्यात पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाचा वारसा आजही जपला गेला आहे. साध्या दिसणाऱ्या या घराचे अंतरंग ग्वाल्हेरच्या राजघराण्याशीही जोडले गेलेले आहेत.

 महायुद्धात जिंकलेल्या स्मृतिचिन्हांनी सजलेला बंगला    

कॅप्टन (कै.) विश्‍वासराव राघोबा शिंदे यांचा हा दगडी बांधणीचा बंगला आहे. मूळ राजारामपुरी सहावी गल्ली संपली की आडवा रस्ता ओलांडल्यावर तिसरा हा बंगला आहे. ग्वाल्हेरच्या संस्थानात जिवाजीराव सिंदिया यांचे सचिव असलेले विश्‍वासराव १९१४ ते १९१८ या कालावधीत पहिल्या महायुद्धात सहभागी होते. या युद्धाची स्मृतिचिन्हे त्यांच्या गणवेशावर दिमाखाने झळकत होती. त्यांचे चिरंजीव सुभेदार मेजर गणपतराव शिंदे १९३९ ते १९४५ या कालावधीत दुसऱ्या महायुद्धात होते. त्यांच्याही गणवेशावर युद्धाची स्मृतिचिन्हे झळकत होती. निवृत्तीनंतर विश्‍वासराव शिंदे यांनी हा बंगला राजारामपुरीत बांधला. त्याकाळी राजारामपुरीत विजेचे दिवे नव्हते. कंदिलाच्या उजेडात रात्र जात होती. आता जिथे बंगला आहे, त्यापुढे सगळी भाताची शेती होती.बंगल्याच्या दारातून विद्यापीठाचा माळ स्पष्ट दिसत होता. विद्यापीठाच्या इमारतीचे त्यावेळी येथे सुरू असलेले बांधकाम या बंगल्याच्या दारात उभे राहूनही दिसत असे.

हेही वाचा - पंचगंगेच्या घाटाची अशी आहेत वैशिष्ट्ये

 एक सिंधी भाजीपाला विक्रेता सायकलवरून रोज भाजी विकायला येत होता. केएमटीचे भवानी मंडप ते राजारामपुरी तिकीट १५ पैसे होते. त्या परिसरात हळूहळू वस्ती वाढत गेली. शिंदे यांच्या बंगल्याची रचना दगडी आहे. बंगला दुमजली आहे. पाठीमागे पुढे मोकळी जागा आहे. पाठीमागे वेगवेगळी झाडे आहेत. आता या परिसरात मोठी वाहतूक व त्याचा आवाज असला तरी या बंगल्यात निरव 
शांतता असते. 

महायुद्धातील युद्धस्मृती हेच बंगल्याचे वैभव

आता विश्‍वासराव यांचे नातू विक्रम व राजेंद्र हे या ठिकाणी राहतात. त्यांच्या ९० वर्षांच्या आई सरस्वती या परिसरातील त्याकाळची शांतता व आताची जीवघेणी वर्दळ या साऱ्या बदलाच्या साक्षीदार आहेत. या बंगल्यात विक्रम व राजेंद्र यांनी आजोबा, वडिलांच्या पहिल्या-दुसऱ्या महायुद्धातील युद्धस्मृती खूप आस्थेने जपल्या आहेत. किंबहुना, तेच या बंगल्याचे 
वैभव आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This bungalow is a memory of second World War