तडीपार गुंड बंटी मालवणकरची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

सांगली : सांगली शहरातील तडीपार गुंड बंटी ऊर्फ प्रतीक समीर मालवणकर (वय 26, रा. मगरमच्छ कॉलनी) याने काल रात्री गवळी गल्लीतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

प्रतीक मालवणकरला सांगली पोलिसांनी एप्रिल महिन्यात सहा महिन्यांसाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार केले होते. काही दिवसांपुर्वीच तो सांगलीत फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर गुंडाविरोधी पथकाने त्याला अटक करून पुन्हा त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली होती. त्यामुळे तो जिल्ह्यातून बाहेर होता.

काल (गुरूवारी) रात्री तो गवळी गल्लीतील घरी परत आला होता. त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

त्याने चार महिन्यापुर्वीही विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तो सराफ व्यावसायिक होता. व्यवसायात अपयश आल्याने निराशेतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्याने त्यावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते. त्यानंतर त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. तडीपार असतानाही तो गेल्या महिन्यात शहरातच फिरत होता. त्यावेळी त्याला गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेऊन शहर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याला पुन्हा तडीपार करण्यात आले होते.

Web Title: bunty malwankar suicide in sangli