भावी गुरुजींच्या खांद्यावर परीक्षांचे ओझे

भावी गुरुजींच्या खांद्यावर परीक्षांचे ओझे

सोलापूर : मागील नऊ वर्षांपासून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भावी गुरुजींना एक नव्हे तर तब्बल चार परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीटीएड-बीएडसह सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊनही मागील आठ वर्षांपासून नोकरीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. दरम्यान, बीएड उत्तीर्ण झालेल्या व पहिली ते पाचवीपर्यंत ज्यांची नियुक्‍ती झाली आहे, त्या भावी गुरुजींना आता भोपाळ येथील एनआयओएस (ओपन स्कूल राष्ट्रीय संस्था) या संस्थेचा सहा महिन्यांचा कोर्स करणे बंधनकारक केले आहे. 

राज्य सरकारने 2013 पासून शिक्षक होण्यासाठी बीएड व डीटीएड उत्तीर्ण भावी गुरुजींसाठी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) सुरू केली. त्यानंतर 2017 मध्ये टेट (अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी) बंधनकारक केली. आता नोकरीवरील शिक्षकांना पत्राद्वारे प्रशिक्षण बंद करून त्यांना भोपाळ येथील संस्थेतर्फे सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स करणे अनिवार्य केले. तर बीएड उत्तीर्ण झालेल्या अन्‌ पहिली ते पाचवीच्या वर्गावर नियुक्‍त झालेल्या शिक्षकांसाठीही तो फेब्रुवारी 2019 पासून बंधनकारक करण्यात आला आहे.

मागील सात वर्षांत शिक्षक होण्यासाठी परीक्षांचे ओझे भावी गुरुजींच्या खांद्यावर टाकले; मात्र सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊनही सद्यःस्थितीत राज्यातील सव्वादोन लाख भावी गुरुजींचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर बीएड व डीटीएड उत्तीर्ण झालेले भावी गुरुजी आता गॅरेज, शेती, टोल प्लाझा, हॉटेल, खासगी कंपन्यांमध्ये कामावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

भोपाळ येथील संस्थेत कोर्स 
बीएड उत्तीर्ण झालेल्या आणि ज्यांची नियुक्‍ती पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी झाली आहे अशा विद्यार्थ्यांना भोपाळ येथील संस्थेतून सहा महिन्यांचा कोर्स करणे बंधनकारक आहे. त्यानुसार बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर एक व दोन देता येईल. 
- तुकाराम सुपे, आयुक्‍त, राष्ट्रीय शिक्षण परिषद, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com