नदीवरील बंधाऱ्यासाठी त्यांनी घेतलं चक्क गाडून! (व्हिडिओ)

प्रशांत काळे
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

आमचा संबंध नाही
सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि या कामाचा काहीही संबंध नाही. हे काम जलसंधारण विभागाचे आहे. त्यामुळे आमची परवानगी घेण्याची काहींच गरज नाही. 
श्री. होनमाने, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बार्शी

सासुरे (ता. बार्शी) : वारंवार विनंत्या करून, सरकारदरबारी हेलपाटे मारून प्रशासन दखलच घेत नाही, तेव्हा मग नाईलाजाने असे काही आंदोलन करावे लागते की, प्रशासन खडबडून जागे होते आणि दखल घेते. असाच प्रकार सासुरे गावात झाला. येथील नागझरी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे रखडलेले काम मार्गी लागावे म्हणून दोन शेतकऱ्यांनी चक्क गळ्यापर्यंत स्वत:ला मातीत गाडून घेत आंदोलन केले.

गेले अनेक महिने या बंधाऱ्याचे काम रखडले आहे. हा बंधारा दोन गावांना जोडतो. मात्र बंधारा रखडल्याने बंधाऱ्यावरून होणारी वाहतूकही बंद होऊन ग्रामस्थांचा जगाशी संपर्क तुटला आहे. काही कारणास्तव सार्वजनिक बांधकाम विभागानेच या बंधाऱ्याचे काम बंद केले. त्याचा निषेध म्हणून सासुरे गावातील बालाजी आवारे आणि अनिल आवारे या दोघांनी गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेत आंदोलन केले.

बाब पोलिसांना समजल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन या दोघा आंदोलनकर्त्यांना बाहेर काढले.

सासुरे-कौठाळी रस्त्यावर नागझरी नदीवरील या कोल्हापूर बंधाऱ्याचे काम २०१७-१८ मध्ये मंजूर झाले होते. काम सुरू होऊन पूर्णत्वाच्या मार्गावर असताना सार्वजनिक बांधकाम विभाग बार्शी यांनी कामाची परवानगी घेतली नाही म्हणून काम बंद केले. त्यामुळे दोन्ही गावांतील वाहतूक बंद झाली. गावांचा संपर्क तुटला. यासाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. पण, प्रशासनाने या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

आमचा संबंध नाही
सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि या कामाचा काहीही संबंध नाही. हे काम जलसंधारण विभागाचे आहे. त्यामुळे आमची परवानगी घेण्याची काहींच गरज नाही. 
श्री. होनमाने, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बार्शी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buried agitation for KT ware