सोलापूर-पुणे महामार्गावर ‘बर्निंग बस’

सोलापूर-पुणे महामार्गावर ‘बर्निंग बस’

सोलापूर -  हैदराबादहून पंढरपूरकडे निघालेल्या बसमधील प्रवाशांसाठी शुक्रवारची पहाट काळरात्र होता होता वाचली. स्थानिक तरुणांच्या धाडसाने १३ जणांचा जीव वाचला अन्‌ जिवावरच्या जखमांवर निभावले. या घटनेमुळे सोलापूर-पुणे महामार्गावरून जाणाऱ्यांनी ‘बर्निंग बस’चा थरार अनुभवला. 

तेलंगण राज्य परिवहन महामंडळाच्या बसने आज पहाटे रस्त्यावर थांबलेल्या मालमोटारीला पाठीमागून धडक दिली. या मालमोटारीतून बॅटऱ्यांची वाहतूक केली जात होती. धडकेनंतर बसने लगेच पेट घेतला. सर्वत्र आग आणि धुरांचे लोट पसरले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी जिवाच्या आकांताने ओरडायला सुरवात केली. त्याचवेळी परिसरातील युवकांनी  जिवाची पर्वा न करता बसच्या आपत्कालीन खिडकीतून प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरवात केली. त्यांनी मिळेल त्या वाहनाने प्रवाशांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयाकडे रवाना केले. अमीर मुलाणी, आकाश सरवदे, तुषार शिंदे, नितीन भोसले, सागर देडे, सुनील बनसोडे अशी या मदतीला धावून जाणाऱ्या युवकांची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com