बस उलटल्याने वीस प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

आज (शनिवारी) सकाळी आठ वाजता गुहा पाटावर अपघात घडला. लक्झरी बस (एआर ०२ ५४६७) हैदराबाद वरुन शिर्डी येथे भरधाव वेगाने जात होती. दुभाजक तोडून बस विरुद्ध बाजूला जावून पलटी झाली. बस मध्ये ४० ते ४५ प्रवासी होते.

राहुरी : गुहा येथे नगर-मनमाड महामार्गावर हैदराबादवरुन शिर्डी येथे चाललेल्या ऑरेंज ट्रॅव्हलची भरधाव वेगाने धावणारी स्लिपर कोच बस उलटून सुमारे वीस प्रवासी जखमी झाले. 

आज (शनिवारी) सकाळी आठ वाजता गुहा पाटावर अपघात घडला. लक्झरी बस (एआर ०२ ५४६७) हैदराबाद वरुन शिर्डी येथे भरधाव वेगाने जात होती. दुभाजक तोडून बस विरुद्ध बाजूला जावून पलटी झाली. बस मध्ये ४० ते ४५ प्रवासी होते. पैकी २० प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुले, महिलांचा समावेश आहे. स्थानिक रहिवासी मदतीला धावले. बसच्या पुढील काचा फोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. सहा रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या.

जखमींना लोणी येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. महामार्गावर अर्धा तास वाहतूक कोंडी झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. क्रेनच्या सहाय्याने बस उभी करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus accident near rahuri 20 are injured