"ही बस' करतेय कौशल्याचा जागर! (व्हिडिओ)

श्रीनिवास दुध्याल
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

- "लेंड अ हॅंड इंडिया'मार्फत शाळांमध्ये साधनांसह प्रात्यक्षिकांचे सादरीकरण 
- 24 राज्यांत विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन व प्रात्यक्षिके 
- सोलापुरातील बुधवारपर्यंत होणार प्रचार- प्रसार 

सोलापूर : "स्किल ऑन व्हील्स' ही मल्टी स्किल फाउंडेशन कोर्सच्या प्रशिक्षणासाठी लागणारी सर्व साधने, यंत्रे व अवजारांनी सुसज्ज व वैशिष्ट्यपूर्ण असलेली बस... या बसमार्फत "लेंड अ हॅंड इंडिया' ही संस्था देशातील 24 राज्यांमध्ये फिरून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, पालक व शिक्षण संस्थांपर्यंत कौशल्य शिक्षणाचा प्रसार व प्रचार करीत आहे. सोलापुरातही गेल्या आठवडाभरापासून "लेंड अ हॅंड इंडिया'मार्फत विविध शाळांमध्ये प्रचारकार्य सुरू आहे. 

हेही वाचा : बापरे! इलेक्‍ट्रीक दुचाकीने घेतला पेट (व्हिडीओ) 

यामुळे सुरु आहे कौशल्याचा जागर 
विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांचा शालेय जीवनातच विकास व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारचा स्किल इंडिया हा कौशल्य विकासावर आधारित उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत सरकारी व खासगी शाळांमध्ये इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा शालेय विषयांपैकी एक पर्यायी कौशल्य शिक्षणाचा विषय उपलब्ध आहे. मात्र, याबाबत अनेक पालक व शिक्षण संस्था अनभिज्ञ आहेत. यामुळे लेंड अ हॅंड इंडिया या पुणे येथील संस्थेतर्फे सोलापुरातील शाळांना भेटी देऊन कौशल्य विकास शिक्षणाविषयी आवड व जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अभिनव उपक्रम राबवला आहे. 

हेही वाचा : कॉंग्रेसने शिवसेनेबरोबर जाण्यापेक्षा भाजपसोबत जावे- कुमारस्वामी 

एवढ्या विद्यार्थींनी प्रसार 
लेंड अ हॅंड इंडिया ही संस्था 2006 पासून कार्यरत असून, महाराष्ट्रातील 750 शाळांसह 24 राज्यांतील आठ हजार 500 शाळांमधील आठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कौशल्य शिक्षणाचा प्रसार करण्यात आला आहे. "स्किल ऑन व्हील्स' या उपक्रमाचे प्रकल्प अधिकारी प्रशांत सोनावले, त्यांचे ट्रेनर विजय बोडा, तुषार कुचेकर व सागर दोंदे हे मार्गदर्शन करीत आहेत. 

हेही वाचा : आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात? राष्ट्रवादीकडून पुरवा सादर 

शाळांमध्ये प्रसाराचा उद्देश 
- कौशल्य शिक्षणाविषयी शालेय स्तरावर जागृती निर्माण करणे 
- विद्यार्थी व शिक्षकांना कौशल्य विषय निवडीची प्रक्रिया समजावून देणे 
- इयत्ता दहावीनंतर व्यवसाय शिक्षणात उपलब्ध पर्यायांची ओळख व ते निवड करण्यास मार्गदर्शन करणे 
- विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसाय जगताची तोंडओळख करून देणे 
- प्रात्यक्षिकातून विविध कौशल्यांची ओळख करून देणे 
- माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर कौशल्य शिक्षण देणाऱ्या योजनांविषयी माहिती देणे 

सोलापुरात बुधवारपर्यंत (ता. 13) "स्किल्स ऑन व्हील्स' कार्यरत राहणार आहे. कौशल्य शिक्षणाविषयी माहितीसाठी शिक्षण संस्थांनी 7972565723 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. गुरुवारी स्किल्स ऑन व्हील्स जयपूरकडे प्रस्थान करणार असून, देशभर प्रचारकार्य करणार आहे. 
- विजय बोडा, वरिष्ठ क्षेत्र अधिकारी, स्किल्स ऑन व्हील्स, सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "This bus is doing 'skill awareness' (video)