निपाणीत तासभर बससेवा बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

महाराष्ट्र बसवर "जय कर्नाटक' लिहिण्याचा प्रयत्न उधळला

महाराष्ट्र बसवर "जय कर्नाटक' लिहिण्याचा प्रयत्न उधळला
निपाणी - कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सीमा भागातील नेत्याने "जय महाराष्ट्र' म्हणू नये, अन्यथा कारवाईचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी कोल्हापूर बस स्थानकावरील कर्नाटक परिवहनच्या बसगाड्यांवर "जय महाराष्ट्र' असा मजकूर शिवसेना कार्यकर्त्यांनी लिहिला. सायंकाळी दोन्ही बस निपाणीत आणल्या. त्या वेळी काही कन्नडधार्जिण्यांनी महाराष्ट्र बसवर "जय कर्नाटक' असा मजकूर लिहिण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. शिवाय महाराष्ट्राच्या एका बसवर दगडफेक करण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला आहे.

मंगळवारी सकाळी कोल्हापूर बस स्थानकावर कर्नाटकाच्या बसगाड्यांवर "जय महाराष्ट्र' लिहिल्याची घटना समजताच बेळगाव, निपाणी व चिक्कोडी आगारातील अधिकाऱ्यांनी तत्काळ माहिती घेतली. त्यानंतर दुपारी 2 ते 3 या वेळेत खबरदारीचा उपाय व धोक्‍याची शक्‍यता लक्षात घेऊन निपाणी आगारातून कोल्हापूरला जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या. निपाणी आगाराच्या दोन बसवर ऑइल पेंटने मजकूर लिहिला होता. सायंकाळी दोन्ही बस निपाणीत आणल्या. त्या वेळी काही कन्नडधार्जिण्यांनी महाराष्ट्र बसवर "जय कर्नाटक' असा मजकूर लिहिण्याच्या हालचाली सुरू केल्या. शिवाय महाराष्ट्राच्या एका बसवर दगडफेक करण्याचा प्रयत्नही फसला. दुपारी तासभर बसफेऱ्या थांबविण्यात आल्या असल्या तरी तीननंतर कर्नाटकातून कोल्हापूर, पुणे, मुंबईला बस वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: bus service close in nipani