चक्क...एकटीसाठी धावली 'ती' बस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद घेऊन धावणारी एसटी सर्वसामान्य प्रवाशांचा खरंच आधार बनली आहे का अशी चर्चा हाेऊ लागली आहे.

सातारा : बस स्थानकावरून राजवाडामार्गे शाहूपुरीला जाणारी बस सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटाने सुटते. मात्र, काल ही बस सहाऐवजी सात वाजता सुटली. या बसमध्ये एकमेव एक महिला प्रवासी होती. ही महिला प्रवासी दुसरी- तिसरी कोणी नव्हती, तर महामंडळातील वरिष्ठ लिपिक पदावर काम करणारी महिला कर्मचारी होती.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

याबाबतची माहिती अशी, सातारा बस स्थानकावरून राजवाडामार्गे शाहूपुरीला जाणाऱ्या बसची फेरी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटाने आहे. ही बस दररोज याचवेळी जाते. मात्र, मंगळवारी ता. 19 ही बस सहाऐवजी सात वाजता बस स्थानकावरून सुटली; पण राजवाड्यापर्यंतच्या प्रवासादरम्यान या बसमध्ये एकमेव महिला प्रवासी होती.

ही प्रवासी महिला म्हणजे एसटी महामंडळाच्या सातारा आगारात काम करणारी वरिष्ठ लिपिकच होती. पुढे ही बस राजवाड्यावरून शाहूपुरीला गेली. शाहूपुरीनंतर ही बस सात वाजता आरेदरेला जाते. त्यानंतर सात वाजून 20 मिनिटांनी ती आझादनगरला जाते; पण फेरीला उशीर झाल्याने ही बस आरेदरेला गेलीच नाही.

त्यामुळे एका महिला कर्मचाऱ्यासाठी बसचे सातशे रुपये उत्पन्न बुडाले. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद घेऊन धावणारी एसटी सर्वसामान्य प्रवाशांचा आधार बनली आहे; पण सातारा आगारात प्रवाशांच्या सेवेऐवजी कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी एसटी बस वापरली जाते, याचा प्रत्यय आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus Service Held Only For Her

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: