हवे सुविधांनी युक्त बसस्थानक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

सावळज- तासगाव तालुक्‍यातील सर्वात मोठी व्यापारी पेठ असलेल्या सावळजला प्रशस्त बसस्थानकाची गरज आहे. जुने बसस्थानक अपुरे पडत आहे. अपुऱ्या जागेमुळे कोंडी होते. अनेक प्रवासी सिद्धेश्‍वर मंदिराचा बसथांबा म्हणून आधार घेत आहेत.

सावळज पूर्व भागातील अकरा खेड्यांचे केंद्रबिंदू आहे. येथे तलाठी, मंडल, पोस्ट, भूमापन, प्राथमिक आरोग्य केंद्र, महा ई-सेवा केंद्र अशी कार्यालये आहेत. अनेक शासकीय व खासगी समवेत शैक्षणिक क्षेत्रातील सेवासुविधा सहज उपलब्ध आहेत. लोकसंख्या वाढत आहे. सर्व सेवा सावळजमध्ये सहज उपलब्ध होत आहे. नागरिकांची मोठी ये-जा वर्दळ असते.

तासगाव-कवठेमहांकाळ आगाराच्या बसेस, खासगी वाहने यांची प्रवासी वाहतूक मोठी आहे. सध्याचे विद्यमान बसस्थानक प्रशस्त नाही. ते अपुरे पडत आहे. लोकांना उपयोग तितकासा होत नाही. या स्थानकाला डिजिटल पोस्टरचा विळखा आहे. प्रवासी नागरिकांपेक्षा स्थानिक युवकांचा बैठक अड्डा बनल्याने महिलांना सिद्धेश्‍वर मंदिराचा आश्रय घ्यावा लागतो.
बसस्थानक चौकातील रस्ता अरुंद असल्याने मोठ्या एसटीसारख्या वाहनांना वळन घेताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. हीच स्थिती मुख्य चौकातील आहे. मोठी दोन वाहने एकत्र आल्यास वाहतुकीची मोठी कोंडी वाढते. मध्यभागातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बसस्थानकाचे स्थलांतर करणे गरजेचे बनले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने यांनी पूर्वी प्रशस्त बसस्थानकाची मागणी लावून धरली. तीच आता नव्याने नागरिकांतून जोर धरत आहे.

गावांत शासनाच्या मालकीच्या अनेक जागा आहेत. दि यशवंत गूळ खांडसरी सहकारी संस्थेची (ज्योतिबा मंदिर परिसर), पाटबंधारे निवासस्थान, देवस्थान समितीच्या अनेक जागा उपलब्ध आहेत. या जागांवर जिल्हाधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण आहे. या जागांवर जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्‍तांच्या परवानगीने या जागेत विकासासाठी आवश्‍यक विविध शासकीय कार्यालये किंवा प्रशस्त बसस्थानक उभे करता येऊ शकते.

हवी सुविधांसह इमारत
विकासवाटेवर असलेल्या सावळजची प्रशस्त बसस्थानकांची गरज आहे. वाढती गर्दी, अपुरे अरुंद बसस्थानक, वाहनांची वर्दळ परिणामी वाहतूक कोंडी या समस्या सोडवण्यासाठी सावळजला हवे आहे प्रशस्त बसस्थानक.

Web Title: bus stands require facilities