करंजोशीच्या विद्यार्थ्यांनी रोखल्या बस

करंजोशीच्या विद्यार्थ्यांनी रोखल्या बस

नागठाणे  : करंजोशी (ता. सातारा) येथील संतप्त विद्यार्थ्यांनी आज सकाळी बस गाड्या रोखून धरत आंदोलन केले. शाळेच्या वेळेत बस थांबत नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर गाड्या सोडण्यात आल्या. 
करंजोशी हे नागठाण्यालगतचे गाव. येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी नागठाणे व सातारा येथे जातात. बहुतांशी विद्यालये ही सकाळच्या सत्रात असल्यामुळे करंजोशी येथील बस थांब्यावर विद्यार्थ्यांची नेहमीच मोठी गर्दी असते. मात्र, सकाळच्या सत्रात तारळे विभागातून साताऱ्याकडे जाणाऱ्या बसगाड्या आधीच प्रवाशांनी भरून येतात. त्यातच बसच्या अपुऱ्या फेऱ्यांच्या अडचणीची भर पडते. त्यामुळे करंजोशीत बस थांबत नसत. त्यामुळे एसटीचा पास असूनही येथील विद्यार्थ्यांना खासगी वडाप गाड्यांचा आधार घ्यावा लागत असे. कित्येकदा शाळेत जाण्यासही उशीर होत असे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड, तसेच मानसिक मनस्ताप सहन करावा लागत होता. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. त्याला आज तोंड फुटले. सकाळी येथील बस थांब्यावर गाड्या न थांबल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. त्यांनी तारळे विभागातून साताऱ्याकडे जाणाऱ्या बस गाड्या अडविल्या. त्यामुळे काहीकाळ येथील वातावरण चांगलेच तापले होते. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन मागे घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com