उद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी निधीची मंजुरी

हुकूम मुलाणी
शनिवार, 31 मार्च 2018

शहरातील सि.स.नं. 255 कल्‍याणप्रभु टेकडी मागील मोकळया जागेत या योजनेतुन उद्योग प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम करणेचा प्रस्‍ताव जिल्‍हा नियोजन समितीकडे दाखल केला होता. यामध्ये इमारत 4 हजार स्‍क्‍वेअर फुटाची 2 मजली होणार आहे.

मंगळवेढा : जिल्‍हा नियोजन समिती अंतर्गत जिल्‍हा वार्षिक योजना 2017-18 अर्थसंकल्पीय निधीतील नाविन्‍यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपालिकेला शहरातील बेरोजगार तरुणांना उद्योग उभा करणेकरीता उद्योग प्रशिक्षण केंद्र उभारणेसाठी 71.10 लाखांचा कामास मंजुरी मिळाली असल्याची माहिती पक्षनेते अजित जगताप यांनी दिली.

शहरातील सि.स.नं. 255 कल्‍याणप्रभु टेकडी मागील मोकळया जागेत या योजनेतुन उद्योग प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम करणेचा प्रस्‍ताव जिल्‍हा नियोजन समितीकडे दाखल केला होता. यामध्ये इमारत 4 हजार स्‍क्‍वेअर फुटाची 2 मजली होणार आहे. अन्य वेळी या हॉलचा शैक्षणिक व इतर चांगल्‍या कार्यासाठी वापर होण्‍यास मदत होणार असून हा प्रस्‍ताव मंजुर झाल्‍यामुळे शहरातील बेरोजगार तरुणांना उद्योग उभा करणेकरीता व महिला बचत गट यांना सुध्‍दा उद्योग उभा करणेसाठी प्रशिक्षण देणेकरीता या इमारतीचा वापर होणार असून याचा महिला बचत गट यांनाही याचा फायदा होणार आहे.

या प्रशिक्षण केंद्रामुळे शहरातील बेरोजगारी कमी होण्‍यास मदत होणार आहे. हा निधी मंजुरीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आ. भारत भालके यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर प्रस्‍ताव मंजुर होणेकरीता नगराध्‍यक्षा अरुणा माळी, उपनगराध्‍यक्ष चंद्रकात घुले, मुख्‍याधिकारी डॉ. नीलेश देशमुख, आरोग्‍य सभापती प्रविण खवतोडे, महिला बालकल्‍याण सभापती अनिता नागणे, बांधकाम सभापती पारुबाई जाधव, नियोजन विकास सभापती भागिरथी नागणे, नगरसेवक संकेत खटके, नगरसेविका राजश्री टाकणे, सुमन शिंदे, सब्‍जपरी मकानदार, लक्ष्‍मीबाई म्‍हेत्रे, रतन पडवळे, निर्मला माने, पांडुरंग नाईकवाडी, अनिल बोदाडे, प्रशांत यादव, राहूल सावंजी, बशिर बागवान या सर्वानी प्रयत्‍न केले.

Web Title: business training centre in Mangalwedha