ज्येष्ठ उद्योजक राम मेनन यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

जेष्ठ उद्योजक राम मेनन यांचे आज पहाटे निधन झाले. सोमवारी  त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नागाव : जेष्ठ उद्योजक राम मेनन यांचे आज पहाटे निधन झाले. सोमवारी  त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राम मेनन यांचे अंदाजे वय नव्वद वर्षे आहे. आज दुपारी अडीच वाजता त्यांची अंतयात्रा निघणार आहे. 

कोल्हापूरच्या औद्योगिक जडण घडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. मेनन ग्रुपचे ते संस्थापक संचालक व माजी अध्यक्ष आहेत. पिस्टन उत्पादनातील गुणवत्तेमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोल्हापूरच्या नावाला लौकिक प्राप्त करून देण्यामध्ये मेनन पिस्टन चे महत्वपूर्ण योगदान आहे. १९६९ साली स्थापन झालेल्या मेनन ग्रुपच्या जडण घडणीत राम मेनन यांचे योगदान अविस्मरणीय आहे. 

त्यांनी कोल्हापूरातील विविध सहकारी बँका, औद्योगिक व व्यावसायिक संस्था तसेच शिक्षण संस्थांमध्ये अध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द अधोरेखित केली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात राम मेनन यांच्या नावाचे विशिष्ट वलय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Businessman Ram Menon passed away