इचलकरंजीमध्ये यंत्रमाग उद्योजकांची आत्महत्या

राजेंद्र होळकर 
शनिवार, 26 मे 2018

येथील खंजिरे मळ्यातील एका यंत्रमाग उद्योजकांने स्वत:च्या कारखान्यामध्ये गळफास लावुन आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. शिवानंद शिवशंकर देशनुरे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याने यंत्रमाग व्यवसायामधील आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याचे पोलिसाच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आले आहे.

इचलकरंजी : येथील खंजिरे मळ्यातील एका यंत्रमाग उद्योजकांने स्वत:च्या कारखान्यामध्ये गळफास लावुन आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. शिवानंद शिवशंकर देशनुरे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याने यंत्रमाग व्यवसायामधील आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याचे पोलिसाच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आले आहे.

उद्योजक शिवानंद देशनुरे हे रात्री स्वत:च्या कारखान्यामध्ये झोपण्यास गेले होते. सकाळी त्याचे घरचे लोक त्याना उठविण्यासाठी म्हणून यंत्रमाग कारखान्याकडे गेले असता, देशनुरे यांनी यंत्रमाग कारखान्यामध्ये दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून उद्योजक शिवानंद देशनुरे याचा मृतदेह मरणोत्तर तपासणीसाठी आयजीएम रुग्णालयाकडे पाठविता. रूग्णालयाच्या आवारात यंत्रमाग व्यवसायिकानी मोठी गर्दी गेली होती. या घटनेची गावभाग पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, देशनुरे यांनी यंत्रमागाच्या व्यवसायातील आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याची पोलिसाच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

Web Title: businessman suicide in ichalkaranji