‘बीव्हीजी’चे ‘भारत विकास’चे स्वप्न होईल पूर्ण - संदीप पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

रहिमतपूर - सर्वसामान्य माणसाला उभे करण्याचे, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या आर्थिक विकासाचे, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे असे लाखो लोकांच्या परिवर्तनाचे स्वप्न रहिमतपूर नगरीचे सुपुत्र, बीव्हीजीचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांनी उराशी बाळगले आहे. त्या दिशेने त्यांची आत्मविश्वासपूर्वक वाटचाल सुरू आहे. त्यांचे ‘भारत विकास’ अर्थात ‘बीव्हीजी’चे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.

येथील मुक्ताई मंगल कार्यालयात बीव्हीजी फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर बीव्हीजीचे संस्थापक हणमंतराव गायकवाड, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष शिवराज माने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.   

सुनील माने म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, त्यांनी विषमुक्त शेती करावी, उत्पादित मालाला हमीभाव मिळावा, ते सबल व्हावेत यासाठी ‘बीव्हीजी’ने पुढाकार घेतला आहे. ही बाब खरंच अभिमानास्पद आहे. ‘बीव्हीजी’ ने रहिमतपूरला मॉडेल व्हिलेज बनवावे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हणमंतराव गायकवाड म्हणाले, ‘‘शेतीतील उत्पादन खर्च ५० टक्‍क्‍यांनी कमी कसा करता येईल व शेती उत्पादन ५० टक्‍क्‍यांनी कसे वाढेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पिकांवर फवारलेल्या रासायनिक द्रव्यांचा, खतांचा घातक परिणाम माणसांच्या आरोग्यावर होत आहे. 

विषमुक्त शेती कशी करावी, यासाठी नवी औषधे व नवे तंत्रज्ञान आले आहे. याचा वापर केला तर आरोग्याचा प्रश्न सुटेल त्याचबरोबर शेतकऱ्यांचा शेती खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.’’ लक्ष्मीकांत देशमुख, विजयसिंह मोहिते, जालंधर सोळसकर, चंद्रकांत साळुंखे, राजू भोसले, भालचंद्र पोळ, विक्रम कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कमी क्षेत्रात विक्रमी उत्पादन काढणाऱ्या तालुक्‍यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. दीपक साबळे यांनी सूत्रसंचालन केले. 
विजयसिंह मोहिते यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी भीमराव पाटील, अविनाश माने, कांतीलाल पाटील, दिलीप कदम, डॉ. एच. एस. कदम, नंदकुमार माने-पाटील, शशिकांत भोसले, विद्याधर बाजारे, विनोद जाधव, पंढरीनाथ गायकवाड, संभाजीराव गायकवाड, विक्रम माने, अरविंद पाटील, संजय महिपाल, जगन्नाथ घाडगे, वैभव माने, रहिमतपूर व परिसरातील तसेच तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: BVG india development sandeep patil