esakal | मोदी सरकारचा महाराष्ट्राशी दुजाभाव ः उद्धव ठाकरेंचा घणाघात
sakal

बोलून बातमी शोधा

c m uddhav thackeray criticism on pm narendra modi in sangli

केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला निधी देताना दुजाभाव सुरु केला आहे. राज्याच्या विकासाला आणि येथील आपत्तीत सापडलेल्या महापूरग्रस्तांना मदत करतानाही हा दुजाभाव स्पष्ट दिसत आहे, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. 

मोदी सरकारचा महाराष्ट्राशी दुजाभाव ः उद्धव ठाकरेंचा घणाघात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली) ः केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला निधी देताना दुजाभाव सुरु केला आहे. राज्याच्या विकासाला आणि येथील आपत्तीत सापडलेल्या महापूरग्रस्तांना मदत करतानाही हा दुजाभाव स्पष्ट दिसत आहे, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला. 

हे पण वाचा -  धक्कादायक - पैशासाठी संस्थाचालकाकडून मुख्याध्यापकास मारहाण 

इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याआधी त्यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. सोबतच मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू उद्योग समूहाच्या विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन त्यांनी केले. 
ते म्हणाले, ""महापुराच्या काळात इथल्या लोकांचे मोठे नुकसान झाले. त्यांना भरपाई वेळेत आणि योग्य दिली जावी, याबाबत राज्य सरकार गंभीर आहे, मात्र केंद्र सरकार निधी देताना दुजाभाव करत आहे. आम्ही हा निधी आमच्यासाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठी मागत आहेत. तरीही त्यात हात आखडता घेणार असतील तर आमचे सरकार लेचेपेचे नाही. कुणाहीपुढे झुकणार नाही.'' 

हे पण वाचा - सिम कार्ड बदलले आणि अडकला पोलिसांच्या जाळ्यात 

ते म्हणाले, ""शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द आम्ही दिला होता. तो पाळला आहे. अजूनही सर्व विषय संपलेले नाहीत. सर्वांना कर्जमाफीचा लाभ व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. आमचे सरकार वचनपुर्ती करणारे सरकार आहे. दोन लाखाच्या वर व नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी चांगली योजना आम्ही तयार करत आहोत. पहिले अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत केली. त्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही मदत करूच ती जोरदारपणे अंमलात आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल.'' 
दरम्यान, श्री. ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेल्या वादावर कोणतेही भाष्य केले नाही. सांगलीत आज शिवप्रतिष्ठानने संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी बंद पुकारला होता. त्यावरही त्यांनी चकार शब्द काढला नाही. त्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते, मात्र त्यांनी या विषयाला फार महत्व दिले नाही.