सोशल मीडीयावर आतापासूनच 'भावी आमदार'

परशुराम कोकणे
शुक्रवार, 30 मार्च 2018

सोलापूर : माजी खासदार (स्व.) लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव, भारतीय जनता पार्टीतील तरुण चेहरा म्हणून ओळख निर्माण केलेल्या नगरसेवक नागेश वल्याळ यांना शहर उत्तर मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. विद्यमान आमदारांनी आता थोडेस थांबावे, नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, असे श्री. वल्याळ यांचे म्हणणे आहे. श्री. वल्याळ आणि त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापासूनच भावी आमदार म्हणायला सुरवात केली आहे. 

शहर उत्तर विधानसभा मतदार संघात सध्या पालकमंत्री असलेले विजयकुमार देशमुख हे नेतृत्व करीत आहेत. पक्षासोबतच समाजाचाही पाठिंबा असल्याने प्रत्येक वेळी शहर उत्तर मतदार संघावर त्यांचीच मालकी दिसून येत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांनी हालचाल करण्यास सुरवात केली आहे. इच्छुकांपैकी एक असलेले नगरसेवक नागेश वल्याळ हे सध्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या जवळ असून अनेक कार्यक्रमात ते एकत्र दिसतात. ज्येष्ठ नेते (स्व.) प्रमोद महाजन, (स्व.) गोपीनाथ मुंडे यांना फॉलो करणाऱ्या नगरसेवक वल्याळ यांचे वडील (स्व.) लिंगराज वल्याळ हे पश्‍चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे पहिले आमदार, पहिले खासदार होते. श्री. वल्याळ हे सध्या प्रभाग क्रमांक नऊचे नगरसेवक आहेत. कुरहिनशेट्टी महासंघाचाही त्यांना पाठिंबा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शहर उत्तर मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास मी इच्छुक असून याबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे. विद्यमान आमदारांनी आता थोडे थांबावे. नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, असे श्री. वल्याळ म्हणाले. 

श्री. वल्याळ यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर आतापासूनच भावी आमदार म्हणायला सुरवात केल्याने भारतीय जनता पार्टीत चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रत्येक वेळी तुमचीच मालकी कशासाठी, या प्रश्‍नाचे उत्तर 2019 मध्ये श्री. वल्याळ यांना सापडणार का, हे पाहावे लागणार आहे.

Web Title: campaigning for mla on social media solapur bjp leader