पाणी उचल परवान्यासाठी लाच घेणारा कालवा निरिक्षक जाळ्यात

Canal Inspector Traps In Bribe Case For Licensing Water
Canal Inspector Traps In Bribe Case For Licensing Water

आटपाडी ( सांगली ) - शेटफळे तलावातील पाणी उचल परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाच स्वीकारताना येथील पाटबंधारे कार्यालयातील कालवा निरीक्षक संदीप वसंत पाटील याला आज लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. या घटनेने पाटबंधारे विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर शिक्कामोर्तबच झाले आहे.        

याबाबत अधिक माहिती अशी की, शेटफळे येथील रेबाई तलावातून अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी स्वतंत्र पाईपलाईन केल्या आहे. या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे उचल परवाने काढले आहेत. या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. पाणी तलावातून उचलण्यास परवानगी दिली जाते. संबंधित तक्रारदार शेतकऱ्याचा पाणी उचल परवाना ५ मार्च २०१८ रोजी संपला होता. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी ११ डिसेंबर २०१९ रोजी ओगलेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाच्या प्रति तासगाव आणि आटपाडी येथील पाटबंधारे विभागाकडे जमा केलेल्या होत्या. तो अर्ज देते वेळी कालवा निरीक्षक संदीप पाटील कार्यालयात भेटले असता अर्जासोबत कागदपत्रात त्रुटी आहेत.

शेतकऱ्याची लाचलुचपत विभागाकडे तक्रार

यातील त्रुटी पूर्ण करून पंधरा हजार रुपये देण्याची त्यांनी संबंधित शेतकऱ्याकडे मागणी केली. यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली. २१ डिसेंबरला संदीप पाटील यांनी संबंधित शेतकऱ्याकडे पंधरा हजार रुपयाची मागणी केली होती. आज संबंधित शेतकऱ्याला पैसे घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात येण्यास सांगितले होते. त्यानुसार सापळा लावला होता. संबंधित तक्रार शेतकऱ्याने संदीप पाटील याला पाच हजार रुपये देऊन एवढेच पैशाची सोय झाली असून राहिलेले दहा हजार नंतर देतो असे सांगितले. त्यानंतर जवळच असलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडून अटक केली.

शेतकऱ्यांची केली जात होती लुट

येथील पाटबंधारे विभागातील कामकाजावर अनेक आरोप आहे. टेंभूचे पाणी सोडणे त्याचे पैसे गोळा करणे यामध्ये मोठा घोळ केला जातो. अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना पाहण्यासाठी अडवणूक करून पैसे घेतले जात असल्याचा अनेक वेळा आरोप झाला आहे. तसेच एचपी आणि पाणी उचल परवान्यासाठी ही शेतकऱ्यांना लुटले जातात होते. यावर आजच्या घटनेने शिक्कामोर्तबच केले आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले आणि पोलीस कर्मचारी संजय कलकुटकी, अविनाश सागर, जितेंद्र काळे, भास्कर मोरे, संजय सपकाळ आदी सहभागी झाले होते.                                 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com