ऋशिकेषला जगण्यासाठी हवा आहे मदतीचा हात... 

rushikesh
rushikesh

तारळे (सातारा) : ढोरोशी ता. पाटण येथील महाविद्यालयीन शिक्षणात अत्यंत हुशार मुलगा... मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांचा आधार बनायचे... खूप शिकायचे... यशस्वी व्हायचे... हा त्याचा ध्यास... खरं तर हा ध्यास घेऊन आयुष्यातील प्रत्येक श्वास घेणाऱ्या ऋषिकेश मगरवर नियतीने वक्रदृष्टी केली. ऋषिकेशला हाडांचा कॅन्सर झाल्याचे कळाल्याने त्याच्यासह कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या बरोबर कुटुंबातील वातावरण बदलून गेले.

येथून सहा किलोमीटर अंतरावरील ढोरोशी ता. पाटण येथे आई वडिलांसोबत राहणारा ऋषिकेश मगर. ध्येयासाठी धडपडणाऱ्या ऋषिकेशचे अचानक पायांचे दुखणे वाढले. उपचार केले, औषधे घेतली पण दुखणे काही थांबले नाही म्हणून, ऋषिकेशच्या सातारा येथे तपासण्या केल्या या तपासण्याअंती धक्कादायक वास्तव समोर आले. ऋषिकेशला हाडाचा कर्करोग असल्याचे  ऐकून ऋषिकेश आणि कुटुंबिय सुन्न झाले. हातावर पोट असणाऱ्या या दांपत्य समोर काळजीचा डोंगर उभा राहिला. त्याला बरे करण्यासाठी आई वडिलांनी धडपड सुरू केली. आयुष्यभर साठवलेली पै न पै खर्च केली, दागिने विकले मात्र उपचाराचा खर्च मोठा असल्याने ते हतबल झाले आहेत. गत महिन्यापासून ऋषिकेश घरात खिळून पडला आहे. हसऱ्या खेळत्या घरात या आजाराने नैराश्याचे ढग जमू लागले.

तारळे खोऱ्यातील दुर्गम भागातील ढोरोशी ता. पाटण येथील हे अत्यंत गरिब कुटुंब. केवळ एक एकर कोरडवाहू शेती व मोलमजुरी करून जगणाऱ्या या कुटुंबावर नियतीने अचानक घाला घातला. शांताराम मगर यांना दोन मुली व ऋषिकेश हा एक मुलगा. काही महिन्यांपूर्वी थोरल्या मुलीचे लग्न झाले. त्यात आधीच शांताराम मगर कर्जबाजारी झाले. अन आता पुन्हा नियतीने दारोदारी भटकण्याची वेळ आणली. सध्या ऋषिकेश बी एस्सी दुस-या वर्षाला शिकत आहे. दुस-याच्या शेतात रोजगार करुन आपली उपजिविका करणारे शांताराम मगर व पुष्पा मगर हे दाम्प्त्य मुलाच्या जगण्यासाठी दारोदार भटकत आहेत. ऋषीकेशवर सध्या शेंद्रे सातारा येथील आन्को कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक चाचण्यासाठी लागणारे ५० ते ६० हजार रुपये शांताराम मगर यांनी उसन वारीवर खर्च केले, मात्र आता कसलेच पैसे उरले नाहीत, करायच काय हा यक्षप्रश्न मगर कुटुंबासमोर उभा आहे. ९० दिवसानंतर पुणे येथे ऋषीकेशच्या पायाची शस्रक्रीया होईल, परंतू आज दररोज होणा-या तपासण्या व शस्रक्रीयेसाठी पैसे नाहीत अशी अवस्था झालीय.

सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील दात्यांनी ऋषीकेशला अर्थिक मदत केल्यास मगर कुटुंबाला मोठा दिलासा मिळेल.... ज्या दात्यांना अर्थिक मदत करायची असेल त्यांनी प्रत्यक्ष भेटून अथवा ऋषीकेश शांताराम मगर, मु.पो.ढोरोशी (तारळे) ता.पाटण जि.सातारा बॅक आफ महाराष्ट्र शाखा तारळे IFSC कोड MAHB0000220 असुन  60276244151  या खात्यावर जमा करावेत. मोबाईल नंबर 9421441549 असुन दात्यांनी संपर्क करुन अडचणीतील कुटुंबाला मदतीचा हात द्यावा असे आवाहन मित्र मंडळींनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com