अबब! सापाचेही कॅन्सरचे ऑपरेशन

सुयोग घाटगे 
सोमवार, 22 जुलै 2019

कोल्हापूर : कोणत्याही ठिकाणांहून वाचवण्यात आलेल्या वन्यप्राण्यांची प्राथमिक तपासणी करण्याच्या नियमाने एका सापाचा जीव वाचला. नाग सर्पाला मानवी वस्तीतुन वाचवल्यानंतर त्याची सर्प मित्राकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली. या तपासणीत गाठ आढळून आल्यामुळे सापाला वन विभागाच्या पशु वाद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी या सापावर शस्त्रक्रिया करून कॅन्सरची गाठ काढण्यात आली. 

कर्करोग म्हटलं की, भल्याभल्यांना घाम फुटतो. इतकेच नव्हे तर उपचारांच्या कसरती आणि उपचारांसाठी होणारे बिल याची भीती वाटते. त्यामुळे कर्करोग हा भयावह आजारांमध्ये गणला गेला आहे. असा कर्करोग फक्त माणसालाच होतो असं नव्हे तर तो जनावरांनाही होतो हे यापूर्वी अनेक घटनांतून सिद्ध झाला आहे. आज या सर्व घटनांना छेद देणारी माहिती किंबहुना ही घटना कोल्हापुरात पुढे आली आहे. ती म्हणजे एका विषारी सर्पाला कर्करोग झाला आणि त्या कर्करोगाची गाठ डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करून यशस्वीपणे बाहेर काढली. पश्चिम महाराष्ट्रातली ही कदाचित पहिलीच घटना असावी असा दावाही या घटनेनंतर व्यक्त होतो आहे. 

फुलेवाडी येथील चोपडे माळ परिसरातील सुनील राजपूत यांच्या घरात नाग सर्प असल्याची वर्दी वन विभागाला मिळाली. या वर्दीनुसार वन विभागासोबत कार्यरत असलेले सर्प मित्र प्रदीप सुतार यांनी या सापाला पकडले. हा साप पकडल्यानंतर या सापाच्या पोटाजवळ गाठ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या सापाला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आणले. या ठिकाणी या सापाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर ही गाठ कॅन्सरची असल्याचे आढळून आले. पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी या सापाची शस्त्रक्रिया करून ही कॅन्सरची गाठ काढली. सध्या या सापाची प्रकृती ठीक आहे. साप संपूर्ण बरा झाल्यानंतर याला सुरक्षित स्थळी सोडण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cancer tumor in snake operated by veterinary surgeon