दलबदलू उमेदवारांची सोशल मीडियावर टर

राजकुमार चौगुले - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - राजकीय स्वार्थापोटी उमेदवारीसाठी एकेका दिवसात तीन तीन पक्षांच्या कार्यालयात उठबस करणाऱ्या ‘निष्ठावंतांची’ उपहासात्मक दखल सोशल मीडियाने घेतली आहे. अशा वृत्तीचा उपहास करणाऱ्या विविध पोस्ट सध्या विविध सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल होत आहेत. वस्तुस्थितीची किनार असणारे विनोद सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. ग्रामपंचायत खालोखालची ईर्षा गावागावांत या निमित्ताने पाहावयास मिळत आहे. उमेदवारीसाठी वाट्टेल ते ब्रीद घेऊन राजकीय नेते प्रयत्न करताना दिसत आहेत.

कोल्हापूर - राजकीय स्वार्थापोटी उमेदवारीसाठी एकेका दिवसात तीन तीन पक्षांच्या कार्यालयात उठबस करणाऱ्या ‘निष्ठावंतांची’ उपहासात्मक दखल सोशल मीडियाने घेतली आहे. अशा वृत्तीचा उपहास करणाऱ्या विविध पोस्ट सध्या विविध सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल होत आहेत. वस्तुस्थितीची किनार असणारे विनोद सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. ग्रामपंचायत खालोखालची ईर्षा गावागावांत या निमित्ताने पाहावयास मिळत आहे. उमेदवारीसाठी वाट्टेल ते ब्रीद घेऊन राजकीय नेते प्रयत्न करताना दिसत आहेत. सकाळी एका पक्षाकडून चर्चेत असणारा संभाव्य उमेदवार सायंकाळी मात्र दुसऱ्याच पक्षातून उमेदवारी भरताना दिसत असल्याने सर्वांच्याच नजरा आश्‍चर्यपूर्ण होत आहेत. सकाळी एका पक्षाची तत्त्वे तावातावाने सांगणारा उमेदवार उमेदवारी नाकारल्याने दुसऱ्या पक्षाचा झेंडा घेऊन लोकांसमोर येत असल्याने गावागावांतील राजकारणाची खिचडी झाली आहे. या सर्व परिस्थितीची दखल सोशल मीडियावरून विनोदाच्या माध्यमातून घेतली जात आहे. 

सोशल मीडियावर फिरणारी पोस्ट  
उमेदवारी अर्ज भरून झाले असतील तर असाल तसे निघून या,
तुम्ही गेल्यापासून आईने अन्नत्याग केला आहे. जाताना शिवसेनेत होता,
नाक्‍यापर्यंत गेला तेव्हा बीजेपीत गेल्याची बातमी आली
दुपारी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याचे समजले 
तीन वाजता काँग्रेसकडून अर्ज भरताना दिसलात
आता नेमक्‍या कोणत्या पक्षात आहात ते सांगा, 
घरी आल्यावर तुमच्यावर कोणी, रागावणार नाही.

Web Title: candidates on social media