विधानसभा निवडणूकीत इच्छुक उमेदवार जनसंपर्कासाठी सातत्याने प्रयत्नशील

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - आमदारकी मिळवण्यासाठी नवरात्र महोत्सवातही जनतेशी असलेला संपर्क कायम रहावा यासाठी पंढरपूर विधानसभा निवडणूकीत इच्छुक उमेदवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. जनतेशी संपर्काची एकही संधी सोडत नसून विधानसभा निवडणूकीला वर्षाचा अवधी असताना कुरुल जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शैला गोडसे यांनी पंढरपूर विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमी नवरात्र महोत्सवातूनही तालुक्यात संपर्क वाढविला.

पंढरपूर विधानसभा निवडणूक ही सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन चौरंगी होणार असल्याचे दिसत आहे. भारत भालके हे हट्रीक करण्यासाठी प्रयत्न करत असताना कोणत्या पक्षातून उमेदवारी घेवून हॅट्रीक करणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. उमेदवारीबाबत सहा महिन्यात कळेल अशी गुगली त्यांनीच टाकली. तर परिचारक हे मागील निवडणूकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयारी केली असली तरी या आखाडयात कोणते परिचारक असणार हे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. तर दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे देखील आमदारकीच्या शर्यतीत असून, त्यासाठी त्यांनी दामाजी कारखाना निवडणूकीत दिलेल्या वचननाम्यातील कमी दरातील साखर देण्याच्या आश्‍वासनाची पुर्ती करत तयारी चालविली आहे. गत निवडणूकीत ते शिवसेनेतून उमेदवार होते.आता पंढरपूरातही संपर्क कार्यालय सुरु करत त्यांनीही राजकीय हालचाली सुरु केल्या तर यंदा शैला गोडसेच्या रुपाने चौथा पर्याय निर्माण झाला आहे. पण शिवसेनेच्या दावेदारीविषयी उत्सुकता कारण आजमितीला समाधान आवताडे व शैला गोडसे शिवसेनेत आहेत. निवडणुकीसाठी स्वबळाची यंत्रणा राबवण्यासाठी आवताडे सक्षम आहेत.गोडसे यांनी मंगळवेढा उपसासिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्याच्या दक्षिण भागात राबता वाढविला. आता नवरात्र महोत्सवातून संपर्कात सातत्य ठेवण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील देवीच्या पुजा करत आहे. 11 महिन्यावर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीत देवीचा आशिर्वाद घेण्यात कोणता उमेदवार यशस्वी ठरणार याची उत्सुकता लागून राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com