जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने कँडल मार्च

Candle March
Candle March

सोलापूर : राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. 31) जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने कँडल मार्च काढला जाणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या घूमजावचा निषेध करण्यासाठी "जवाब दो'चा नारा देण्यात येणार आहे.

बुधवारी जिल्ह्यातील कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता चार पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कँडल मार्च काढण्यात येणार आहे. संघटनेला सरकारने 16 ऑक्‍टोबरला चर्चेला बोलावले होते. त्यानुसार राज्याचे मुख्य वित्त सचिव यांच्यासोबत संघटनेच्या शिष्टमंडळाने दोन दिवस चर्चा करून नवीन पेन्शन अन्यायकारक असल्याचे पटवून दिले. यावर वित्त सचिवांनी जुनी पेन्शनबाबतचा निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळासमोर विषय येणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. जुनी पेन्शनचा विषय मंत्रिमंडळासमोर घेणार का? जुनी पेन्शन योजना कधी लागू करणार? याचा जाब विचारण्यासाठी कर्मचारी आता सरसावलेले आहेत. 

अन्यायकारक अशा नवीन पेन्शन योजनेला 31 ऑक्‍टोबरला 13 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, आश्रमशाळा, महसूल, जिल्हा परिषद कर्मचारी, आयटीआय, नगरपालिका, महानगरपालिका, तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी बुधवारी दिवसभर काळ्या फिती लावून काम करतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी शंतनू गायकवाड, राम फलफले, संतोष नीळ, शंकर जाधव, रिजवान शेख, रत्नाकर कांबळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com