रेशनिंगच्या मक्याची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो पकडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

रेशनिंगच्या मक्याची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या पथकाने काल रात्री चचेगाव येथे पकडला. या प्रकरणी इम्तियाज युसुफ सय्यद (वय 43, रा. बैल बाजार रोड, कऱ्हाड) व फारूक मस्जिद मोमीन (वय 52, रा. रविवार पेठ, कऱ्हाड) यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

कऱ्हाड- रेशनिंगच्या मक्याची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या पथकाने काल रात्री चचेगाव येथे पकडला. या प्रकरणी इम्तियाज युसुफ सय्यद (वय 43, रा. बैल बाजार रोड, कऱ्हाड) व फारूक मस्जिद मोमीन (वय 52, रा. रविवार पेठ, कऱ्हाड) यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ढेबेवाडी (ता. पाटण) येथून फारूक मोमीन हे टेम्पोमधुन रेशनिंगच्या मक्याची बेकायदेशीररित्या वाहतूक करत कऱ्हाडला घेवुन येत होते. त्याची माहिती मिळाल्यावर पोलिस उपाधिक्षक ढवळे यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी कऱ्हाड ढेबेवाडी मार्गावर चचेगाव येथे टेंम्पो अडवून चौकशी केली. त्यावेळी रेशनिंगचा मका मोमीन यांनीच खरेदी करून आणल्याचे उघडकीस आले. त्यावेळी फारूक मोमीन आणि टेम्पो चालक इमतियाज सय्यद यांच्यासह टेम्पो ताब्यात घेतला.

टेम्पोसह मका असा एकूण 2 लाख 13 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिस उपाधिक्षक ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बी. आर. जगदाळे, प्रवीण पवार, सागर बर्गे व चंद्रकांत पाटील यांनी केली.

Web Title: Capture the tempo transporting rationing maize illegally