ते गेले होते धाब्यावर जेवणासाठी अन् काळाने घातला घाला....

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 22 May 2020

मोटार अपघातात गंभीर जखमी झालेल्या डॉक्‍टराचा गुरुवार  रात्री एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बेळगाव : मोटार अपघातात गंभीर जखमी झालेल्या डॉक्‍टराचा गुरुवार  रात्री एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. रेफरिज सिंग (वय 44 मुळ रा. पंजाब सध्या रा. एनआरआय हॉस्टेल) असे त्यांचे नाव आहे. तर अन्य तीघे डॉक्‍टर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बुधवार  सायंकाळी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उक्‍कड गावानजिक हा अपघात घडला होता. अपघाताची नोंद काकती पोलीस ठाण्यात झाली आहे. 

डॉ. यश दीपक मोदी (वर 25, मुळ रा. गुजरात सध्या रा. अजमनगर), डॉ. अश्‍विन आनंद हंजी (वय 25 मुळ रा. पंजाब सध्या रा. कुवेंपुनगर) आणि हरलिन सिंग कुलदीप सिंग (वय 26 मुळ रा. पंजाब सध्या रा. सदाशिवनगर) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा- बेळगावात अनोखे आंदोलन; रुग्णालयासमोर गुलाब ठेवून निदर्शने -

वरील चौघेही एमबीबीएस डॉक्‍टर असून ते शहरातील एका नामाकिंत खासगी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर म्हणून सेवा बजावत होते. बुधवारी सायंकाळी ते मोटारीतून वंटमुरी येथे एका धाब्यावर जेवणासाठी जात होते. मोटार पुणे बंगळूर राष्ट्रीय महामर्गावरील उक्‍कड गावानजिक आली असताना चालक डॉ. यश यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. मोटाराची समोरील ट्रकला ठोकर झाडाला जोरदार धडकल्याने तीघे गंभीर जखमी झाले. तर चालक यश हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच काहींनी जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. मात्र, काल रात्री डॉ. रेफरिज यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: car accident in belgium district