अक्कलकोट: शॉर्टसर्किटने स्कोडा कार जळून खाक

राजशेखर चौधरी
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

२००६ मॉडेलच्या या गाडीच्या जळण्याने २.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने प्रसंगावधान राखत दोघेही खाली उतरल्याने जीवितहानी झाली नाही.रात्री पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.आज याचा पंचनामा करण्यात आला.याची फिर्याद स्वतः जगदिश यांनी दिली आहे.अधिक तपास मल्लिनाथ कलशेट्टी हे करीत आहेत.

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट स्टेशनजवळ काल ता.४ रोजी रात्री ११.४५ वाजता इंजिन जवळ वायर मध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किटने स्कोडा कार जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

याची नोंद अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात झाली आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जगदीश दत्तात्रय सुगंधी वय ३५ वर्षे रा.लक्ष्मीगंज,शहाबाद जिल्हा कलबुर्गी हे आपल्या भावासह स्कोडा गाडी क्रमांक एमएच ०४ सीएम ३२८३ यातून  अक्कलकोटला येत असताना रात्री ११.४५ वाजता स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपजवळ अचानक इंजिन जवळील वायरमध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किटने आग लागली आणि त्यामुळे संपूर्ण कार जाळून खाक झाली आहे.

२००६ मॉडेलच्या या गाडीच्या जळण्याने २.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने प्रसंगावधान राखत दोघेही खाली उतरल्याने जीवितहानी झाली नाही.रात्री पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.आज याचा पंचनामा करण्यात आला.याची फिर्याद स्वतः जगदिश यांनी दिली आहे.अधिक तपास मल्लिनाथ कलशेट्टी हे करीत आहेत.

काल रात्री १२ वाजता आम्ही प्रवासात असतानाच अचानक गाडीने पेट घेतला पण त्याचवेळी तोळनूर येथील शिक्षक शरणप्पा फुलारी यांनी आम्हाला मोलाची मदत केली.फोन करून पोलीस बोलावून घेतले. रात्री दीड वाजेपर्यंत ते आमच्यासोबत होते. त्यांच्यामुळेच आम्हाला मोलाची मदत मिळाली.
- जगदीश सुगंधी
 
Web Title: car catch fire in Akkalkot