आंबेनळी घाटात कार कोसळली, चालक जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

महाबळेश्वर - पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी एक बीएमड्ब्लू कार ४०-५० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये चालक जखमी झाला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, कार चालक प्रशांत राजेंद्र सोसटे पुणे हे पोलादपूर बाजूकडून महाबळेश्वरला निघाले होते. शनिवारी सकाळी आंबेनळी घाटातील बावली टोक येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी दरीत कोसळली तर ससाटे हे गाडीतून बाहेर पडून झाडावर अडकले. पाठीमागून येणाऱ्या एका गाडीतील चालकाने याची माहिती प्रतापगड येथील वाडा कुंभरोशी येथील ग्रामस्थ यांना दिली. त्यानंतर गावातील युवक आणि नागरिकांनी मदत कार्य राबवून त्यांना बाहेर काढले.

Web Title: car crash in aambenali ghat