गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रेलिंग तोडून १०० फूट खाली

संतोष चव्हाण
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

उंब्रज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज (ता.कराड) गावचे हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार तारळी पूला नजीक असणाऱ्या दुभाजकाला धडकून संरक्षण रॅलिंग तोडून कार सुमारे १०० फूट खाली जाऊन थांबली. यामध्ये दोन जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

अनिता विष्णू साळुंखे (वय. ४२), प्रियांका विष्णू साळुंखे (वय २२) दोघे रा. राजापूर अशी जखमींची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन कराड ते सातारा जाणार्या लेनवर भरधाव वेगात जाणारी स्विफ्ट डिझायर कंपनीची कार उंब्रज गावचे हद्दीत आली असता तारळी पूला नजीक असणाऱ्या वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गाकडेला असणारे संरक्षण रॅलिंग तोडून तारळी नदी पात्रालगत असलेल्या कचरा डेपोत सुमारे १०० फूट खाली जाऊन थांबली.

सुदैवाने कार कचरा डेपोत गेल्याने कारमधील प्रवाशी बचावले अशी चर्चा घटना स्थळी नागरिकांची सुरू होती.  अपघातात दोन महिला किरकोळ जखमी झाल्या त्यांना स्थानिक तसेच पोलिस यांच्या मदतीने उंब्रज येथील शारदा क्लिनीक मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Web Title: car fall down 100 fit