वाठारजवळील पुलावरुन कार 30 फुट खाली कोसळली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

कऱ्हाड : पुणे-बेंगळुरु महामार्गावरील वाठार जवळील दक्षिण मांड नदीच्या पुलावरून 30 फूटखाली कार पडली. त्यामध्ये गाडीतील चौघांपैकी तीघे जखमी झाले असुन त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संगीता सुरेश नलवडे (वय 45), प्रियांका सनी नलवडे (वय 24) व मिताली सनी नलवडे (वय 13) असे जखमी झालेल्यांची नावे असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. 

पुणे-बेंगळुरु महामार्गावरुन कोल्हापुरकडुन सातारकडे निघालेली आय व्टेंटी गाडी आज दुपारी साडेबाराच्या सुमारास वाठार जवळील दक्षिण मांड नदीच्या पुलावरुन खाली पडली. त्याची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिस निरीक्षक अशोकराव क्षिरसागर पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याचदरम्यान हायवे पेट्रोलिंगचे कर्मचारीही तेथे दाखल झाले. जखमींना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: car fallen from bridge 30 ft