सावधान ! ऑनलाइन पेमेंट करताय : अशी घ्या काळजी 

तात्या लांडगे
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

सायबर तज्ज्ञ म्हणतात... 
- आपला युपीआय पिन कोणालाही सांगू अथवा देऊ नये 
- कोणत्याही स्थितीत युपीआय मेसेज कोणात्याही क्रमांकावर पाठवू नका 
- पैसे पाठवा, वस्तू पाठवितो असे सांगणाऱ्यावर विश्‍वास ठेवू नका 
- गुगल वरुन कस्टमर केअर क्रमांक शोधून त्यावर संपर्क करताना सावधान राहा 
- प्रत्यक्षा अथवा सुरक्षित आर्थिक व्यवहारांवर भर द्या 
- आर्थिक व्यवहारात शंका अथवा संशय आल्यास संबंधित बॅंकेशी तत्काळ संपर्क करा 

सोलापूर : खरेदी विक्रीची अनेक ऑनलाइन संकेतस्थळे असून ती संकेतस्थळेच सायबर गुन्हेगारांचे सावज हेरण्याचे ठिकाण बनले आहेत.

 

पतीने का केला पत्नीवर खुनी हल्ला 

 

फोन पेवर पाठविलेली रक्‍कम ऍपच्या नोटिफिकेशनमध्ये पेंडिंग असल्याचे सांगून त्या नोटिफिकेशनमध्ये एक क्‍युआर कोड सेंड केलेला असतो. अजाणतेपणे जर तो क्‍यूआर कोड स्कॅन केला तर तुमच्या बॅंक खात्यातून सारे पैसे समोरील व्यक्‍तीच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे संशयिताने पाठविलेला क्‍यूआर कोड हा पैसे येण्यासाठी नसून पैसे घेण्याचा असतो. त्या क्‍यूआर कोडच्या खाली बारीक अक्षरात प्लीज पे टू असे म्हटलेले असते. अशावेळी संशयिताला क्‍यूआर कोड स्कॅनिंग न करता थेट बॅंक खाते क्रमांक देत त्यात पैसे पाठविण्यास सांगावे. जेणेकरुन समोरचे सावज आपली फसवणूक करणारे नाही, याची खात्री होईल. 

प्राध्यापिकेने केला आत्महत्येचा प्रयत्न

रोखीच्या व्यवहारापेक्षा सुरक्षितता म्हणून ऑनलाइन व्यवहाराकडे पाहीले जात आहे. त्यामुळे चोरटेही आता तंत्रज्ञान शिकले असल्याने सायबर गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे अनेकांची आर्थिक फसवणूक होत असून याबाबत सोलापूर शहर-जिल्ह्यासाठी सायबर कक्ष आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी सायबर केंद्र असून अडचण नसून खोंळबा बनल्याचे चित्र आहे. वृध्द, सुशिक्षित नागरिक अमिषाला बळी पडत आहेत, तर काही ठिकाणी बॅंकेतून फोन आल्याचे समजून खात्याची माहिती देत असल्याने पोलिसही हतबल झाले आहेत. सायबर गुन्हेगारीत ओटीपी घेऊन फसवणूक करणे, एटीएम कार्ड क्‍लोनिंग करुन गंडा घालण्याचे प्रमाण वाढत असतानाही सायबर गुन्हेगार त्याहूनही पलिकडे पोहचल्याचे पोलिस सांगू लागले आहेत. 

 

....तर घरी येणार दंडाची पावती

सोलापुरातील पाचशे जणांची फसवणूक 
डजिटल इंडियाचा गवगवा सर्व शासकीय कार्यालयांसह बॅंकिंग व्यवहारात केला जात आहे. मात्र, ऑनलाइन पेमेंट करतानाच व्यवहार डोळसपणे हाताळता न आल्यास तुमच्या बॅंक खात्यात एक रुपयाही राहणार नाही. सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन आर्थिक गंडा घालण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी आता नवनव्या क्‍लृप्त्या शोधून काढल्या आहेत. मागील काही दिवसांपासून क्‍यूआर काडेने पेमेंट करण्याचा फंडा वापरुन गंडा घातला जातोय. आतापर्यंत सोलापूर शहर-जिल्ह्यातील पाचशेहून अधिक जणांची कोट्यवधींची फसवणूक झाली आहे. मात्र, बहूतांश गुन्हेगारांचा शोध सुरुच आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Careful! Paying online: Take care of this