‘सकाळ’तर्फे उद्यापासून करिअर प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

सातारा - नर्सरीपासून पदवी, पदव्युत्तर आणि दहावी, बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी कोणत्या संधी आहेत, यासंबंधीची सखोल माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पोचे आयोजन केले आहे. येत्या २४ ते २६ मे यादरम्यान येथील राधिका रोडवरील राधिका सांस्कृतिक संकुलामध्ये हा एक्‍स्पो होणार आहे. 

सातारा - नर्सरीपासून पदवी, पदव्युत्तर आणि दहावी, बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी कोणत्या संधी आहेत, यासंबंधीची सखोल माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पोचे आयोजन केले आहे. येत्या २४ ते २६ मे यादरम्यान येथील राधिका रोडवरील राधिका सांस्कृतिक संकुलामध्ये हा एक्‍स्पो होणार आहे. 

सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे-मुंबईतील दर्जेदार शिक्षण संस्थांचा समावेश यामध्ये असेल. स्टॉल बुकिंगला अल्पावधीतच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या प्रदर्शनाचे फूड पार्टनर हॉटेल महाराजा पॅलेस इन असोसिएशन वुईथ समर्थ एज्युकेशनल ट्रस्ट हे आहेत तर केक बेक हे सहप्रायोजक आहेत.

दहावी, बारावीची परीक्षा झाली. गुणांची यादी हाती येईल. क्षमता कळेल, पण पुढे काय, असा भला मोठा प्रश्‍नही पडेल. कोणते क्षेत्र निवडायचे, करिअर कशात करायचे, या प्रश्‍नांसाठी हे प्रदर्शन लाभदायी ठरणार आहे. मनातील साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे येथे मिळून जातील. मग, करिअरच्या वाटा सोप्या होतील. तज्ज्ञांचाही मौलिक सल्ला व्याख्यानांच्या माध्यमातून दिला जाईल.

नर्सरी ते पदवीपर्यंत, तसेच विविध कोर्सेसमध्ये करिअरच्या संधी कोणत्या आहेत, नेमके कोणते कौशल्य हवे आणि त्यासाठी नेमके काय शिकायला हवे, या संभ्रमावस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी अशा प्रदर्शनाची परंपरा ‘सकाळ’ने काही वर्षांपासून सुरू केली आहे. त्याला दरवर्षी प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना ‘राइट चॉइस ऑन राइट टाइम’च ठरणार आहे. प्रदर्शनात करिअर मार्गदर्शन, शिक्षण संधींबाबत तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, समुपदेशन होणार आहे. अभियांत्रिकीच्या विविध शाखा, सॉफ्टवेअर, फार्मसी, एमबीए, माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग, हॉटेल मॅनेजमेंट, ॲबॅकस, ॲनिमेशन, फायर अँड सिक्‍युरिटी आदी व्यावसायिक अभ्यासक्रम आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असेल. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचेही स्टॉल असतील. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेणारा ‘एक्‍स्पिरियन्स झोन’ हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.

अधिक माहितीसाठी...
‘सकाळ एज्युस्पायर’ प्रदर्शनासाठी स्टॉल बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोजकेच स्टॉल शिल्लक आहेत. इच्छुक शैक्षणिक संस्थांनी अधिक माहितीसाठी प्रदीप राऊत ९९२३२३३९९९ , प्रभाकर पवार ८८८८८०१२४५ यांच्याशी संपर्क साधावा. कऱ्हाड येथेही एक ते तीन जून दरम्यान यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाउन हॉल) येथे ‘सकाळ एज्युस्पायर’ हे प्रदर्शन होणार आहे.

Web Title: carrier exhibition by sakal